विधानसभेत डिपॉझिट जप्त | आता बिचुकले पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सज्ज

पुणे, ८ नोव्हेंबर: कलर्स मराठीवरील बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी २०१९ मधील निवडणूक थेट मुंबईतील वरळी मतदारसंघांतून म्हणजे थाट आदित्य ठाकरे यांच्या विरुद्धच लढवली होती. त्यावेळी चर्चेत असले तरी निवडणुकीत काही विशेष करतील असं चित्र नव्हतं. त्याप्रमाणेच निकाल आले आणि अभिजित बिचुकले यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. मात्र आता अभिजित बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
आता त्यांनी थेट पदवीधर मतदारसंघाची निवडणुक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अभिजित बिचुकले यांनी शनिवारी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आता आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. तर ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “माझा चाहतावर्ग मला नेहमीच पाठिंबा देत असतो. मात्र पैसा आणि सत्तेच्या ताकदीसमोर माझी चिकाटी अत्यंत कमी पडते. परिणामी माझा पराभव होत आला आहे. मात्र ता पदवीधर मतदारांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे. मी शिक्षण आणि नोकऱ्यांना प्राधान्य देणार आहे. मला एकदा संधी देऊन पाहावी,” असं बिचुकले यांनी मतदारांना आवाहन केलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आली असू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रूपाली पाटील-ठोंबरे यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
News English Summary: Bigg Boss fame Abhijit Bichukale had contested the 2019 elections directly from Mumbai’s Worli constituency against Shivsena leader Aaditya Thackeray. Though it was being discussed at that time, there was no picture that they would do anything special in the election. The result was the same and the deposit of Abhijit Bichukale was confiscated. But now Abhijit Bichukale is in the fray again. Now he has announced his decision to run directly in the graduate constituency.
News English Title: Colors TV Big Boss Fame Abhijit Bichukale will contest Pune Graduate Constituency election News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN