फडणवीस काही सुचवूत आहेत का | दरेकरांना ताब्यात घेण्यासाठी फडणवीसांकडे पुरावे असतील तर द्यावेत
मुंबई, १३ डिसेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या कामाची माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासह विरोधी पक्षांवर देखील जोरदार निशाणा साधला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल उपस्थित केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “जनतेच्या मताचा विचार केला तर जनतेच्या मनात अशी कोणतीही भावना नाही. जर राज्यात अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? शेतकरी दिल्लीच्या सीमेवर त्यांच्या न्याय हक्कासाठी ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्याशी नीट बोलणं, त्यांच्या भावना समजून घेणं या गोष्टी तर सोडाच पण भर थंडीत शेतकऱ्यांना उघड्यावर बसावं लागतंय. त्यांच्यावर थंडगार पाण्याचे फवारे मारले जात आहेत. हे काही सद्भावनेचं लक्षण नाही. जर याची व्याख्याच त्यांना बदलायची असेल तर ते बदलू शकतात.”
दरम्यान, राज्य सरकारविषयी जनतेमध्ये कोणतीही नाराजी नाही. परंतु विरोधी पक्षामध्येच विरोधी हा शब्द आहे त्यामुळे त्यांना त्या शब्दाला जागावं लागतं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना ताब्यात घेण्यात विषयी आमच्या सरकारमधलं कुणीही काही बोललेलं नाही. देवेंद्र फडणवीस आम्हाला हे काही सुचवू पाहात आहेत का? देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पक्षात कोण हवं आहे आणि कोण नकोय हे सुद्धा कळत नाही. प्रविण दरेकर यांना ताब्यात घेण्याबद्दल फडणवीसांकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी जरुर द्यावेत असाही टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
News English Summary: There is no resentment among the people about the state government. But the word opposition is in the opposition so they have to wake up to that word. No one in our government has spoken about the arrest of Pravin Darekar, Leader of Opposition in the Legislative Council. Is Devendra Fadnavis trying to suggest something to us? Devendra Fadnavis does not even know who wants and who does not want in his party. Uddhav Thackeray also demanded that if Fadnavis had any evidence about the arrest of Pravin Darekar, he should give it.
News English Title: Chief Minister Uddhav Thackeray reply on BJP Leader Pravin Darekar news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्ससहित टॉप कंपन्यांचे शेअर्स स्वस्तात खरेदीची संधी? किती फायदा होईल?
- Rajnish Retail Share Price | स्टॉक प्राईस 83 रुपये, दिला 12000% परतावा, श्रीमंत करतोय हा शेअर
- Salary Saving | नोकरदारांनो! पगारवाढ 5-10% झाली तरी काळजी करू नका, स्मार्ट बचत देईल मोठा परतावा
- RVNL Share Price | PSU शेअरने 1 महिन्यात दिला 42% परतावा, स्वस्तात खरेदी करा, मोठा फायदा होईल
- JP Associates Share Price | स्टॉक प्राईस 11 रुपये, यापूर्वी दिला 705 टक्के परतावा, शेअर 'BUY' करावा की 'Sell'?
- RVNL Share Price | पटापट परतावा देतोय RVNL स्टॉक, 1 महिन्यात दिला 35% परतावा, वेळीच खरेदी करा
- Nandan Denim Share Price | शेअर प्राईस रु. 45, 2 दिवसात दिला 16% परतावा, स्टॉक स्प्लिटच्या अपडेटने तुफान खरेदी
- NMDC Share Price | NMDC शेअरची रेटिंग अपग्रेड, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी
- RVNL Share Price | PSU स्टॉक खरेदी करा, 1 महिन्यात दिला 33% परतावा, पुढे पुन्हा मल्टिबॅगर?
- PM Kisan | शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'या' तारखेला खात्यात येणार पैसे, फायद्याची अपडेट जाणून घ्या