जलेबी ना फापडा अशा कार्यक्रमांनी लोकं जवळ येत नाहीत | कृतीतून लोकं जवळ येतात - फडणवीस

मुंबई, ११ जानेवारी: मुंबई महानगरपालिकेत भाजपाची वोट बँक तोडण्यासाठी देखील शिवसेना तयारीला लागली आहे. शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
दरम्यान शिवसेना देखील अमराठी मतांसाठी जोरदारपणे तयारीला लागली आहे. याचाच भाग म्हणून शिवसेनेकडून ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ मोहीम सुरु केली आहे. शिवसेनेकडून गुजरातींसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिवसेनेच्या या प्रयत्नांची राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे. ‘निवडणुकीच्या व्यतिरिक्तही शिवसेनेनं गुजराती समाजाशी सौहार्द ठेवायला हवा,’ असा खोचक टोला फडणवीस यांनी हाणला आहे.
लोणावळा येथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. गुजराती समाजाशी जवळीक साधण्याच्या हेतूनं शिवसेनेनं काल जोगेश्वरी येथे गुजराती भाषिकांचा मेळावा आयोजित केला होता. ‘मुंबई मा जलेबी ना फापडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी या कार्यक्रमाची टॅगलाइन होती. पत्रकारांनी याबाबत फडणवीसांना विचारलं असता, ‘गुजराती समाजाला निवडणुकीसाठी का होईना, जवळ करण्याचा प्रयत्न शिवसेना करतेय याचा आनंद आहे. निवडणुकीच्या व्यतिरिक्तही त्यांनी गुजराती समाजाशी सौहार्द ठेवायला हवा. शेवटी तेही आपले नागरिक आहेत,’ असं फडणवीस म्हणाले.
एकीकडं अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला शिवसेना कडाडून विरोध करतेय आणि दुसरीकडं गुजराती समाजाला जवळ घेऊ म्हणतेय. अशा कार्यक्रमांनी कोणी जवळ येत नाही. कृतीतून लोक जवळ येतात,’ असं फडणवीस म्हणाले.
News English Summary: Shiv Sena had organised a gathering of Gujarati community at Jogeshwari yesterday with the aim of getting closer to the Gujarati community. The tagline of the event was ‘Mumbai Ma Jalebi Na Fapda, Uddhav Thackeray Apda’. Journalists would have asked Fadnavis about this, ‘I am happy that Shiv Sena is trying to bring the Gujarati community closer for the elections. Apart from elections, they should also be friendly with the Gujarati community. After all, they are also our citizens, ‘said Fadnavis.
News English Title: Devendra Fadnavis criticised Shivsena over organising Gujarati community program news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH