3 May 2025 6:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

अजित पवारांच्या इलेक्टिव्ह मेरिट शब्दप्रयोगाने पुणे भाजपला धडकी | लोटसच्या ऑपरेशनची तयारी?

Deputy CM Ajit Pawar, Political break, Pune BJP

पुणे, १५ फेब्रुवारी: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असलेल्यांना वाजत पक्षात घेणार असल्याचे वक्तव्य केले होते. पवार यांच्या भूमिकेमुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या गोटात मात्र पुन्हा एकदा कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी १९ नगरसेवकांवर ‘वॉच’ ठेवत असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांसह महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकारी न बदलण्याच्या पक्षाच्या निर्णयामुळे काही ज्येष्ठ नगरसेवक नाराज आहेत. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत दगाफटका होऊ नये याकरिता भारतीय जनता पक्ष अधिक सतर्क झाली आहे.

स्थायी समितीच्या ८ सदस्यांची निवड लवकरच केली जाणार आहे. यावेळी अध्यक्ष कोण असणार याबद्दल सुरुवातीला असलेली उत्सुकता शमली आहे. कारण विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांनाच मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. सभागृह नेते बदलानंतर महापौर बदलाची चर्चा सुरु झाली होती. महापौरपदावर नवा चेहरा हवा, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली होती. परंतु, महापौरही बदलणार नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट केले आहे.

पालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर मुक्ता टिळक, मुरलीधर मोहोळ, सुनील कांबळे, योगेश मुळीक, हेमंत रासने, श्रीनाथ भिमाले, धीरज घाटे यांना प्रमुख पदांवर संधी मिळाली. नव्या चेहऱ्यांना संधी मिळणे गरजेचे असल्याचे मत काही नगरसेवक खासगीत व्यक्त करीत आहेत. यंदा काही उपनगरांसह सिंहगड रस्ता परिसराला प्रतिनिधित्व मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. त्यादृष्टीने श्रीकांत जगताप, राजाभाऊ लायगुडे, शंकर पवार यांनी तयारी चालविली होती. सातारा रस्त्यावरील धनकवडीतील नगरसेविका वर्षा तापकीर, राजेंद्र शिळीमकर हे स्थायी समिती अध्यक्षपदाच्या ‘रेस’मध्ये होते. मात्र, त्यांची देखील संधी हुकल्याचे बोलले जात आहे.

मागील काही दिवसांत भारतीय जनता पक्षातील ‘आयारामां’ना पुन्हा परतीचे वेध लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना पक्षात घेण्याचे केलेले वक्तव्य पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे मानले जात आहे. ठराविक नगरसेवकांना संधी मिळत असल्याने नाराज नगरसेवकांना ‘गळाला’ लावण्याचे प्रयत्न विरोधी पक्षांकडून केले जातीलच. भारतीय जनता पक्षाला नागपूर पालिकेत असाच फटका बसला असून त्याची पुनरावृत्ती टाळण्याचे आव्हान आहे.

 

News English Summary: State Deputy Chief Minister Ajit Pawar had said in Pune that he would take those with ‘elective merit’ to the party. Pawar’s role, however, has once again caused a great deal of unrest in the Bharatiya Janata Party, the main opposition party. A few days ago, there was talk of keeping a ‘watch’ on 19 corporators. In addition, some senior councilors are unhappy with the party’s decision not to change key positions, including the mayor and standing committee chairman. Therefore, the Bharatiya Janata Party (BJP) has become more vigilant to prevent a scuffle in the forthcoming municipal elections.

News English Title: Deputy CM Ajit Pawar may give bog political break to BJP in Pune news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या