3 May 2025 6:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

पुलवामा हल्ल्यापेक्षा अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांची चौकशी महत्वाची - भाऊ जगताप

Pulawama Attacked, NIA, Bhai Jagtap, BJP

मुंबई, १४ मार्च: मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हिरेन प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी उचलून धरले. यासोबतच मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांबद्दल सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरासमोर आले आहेत.

नसुख हिरेन प्रकरणामुळे चर्चेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा (NIA) मार्ग मोकळा झाला आहे. ‘एनआय’च्या वकिलांनी सचिन वाझे यांची 14 दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती.

अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओत सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्यानंतर तपासाला वेग आला. NIA ने केवळ २ दिवसात केलेल्या जलद कारवाईनंतर सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना लक्ष केलं आहे. कारण पुलावामातील भ्याड हल्ल्यात शेकडो किलोचा RDX वापरला गेला होता आणि त्यात सीआरपीएफ तब्बल ४० जवान शहीद झाले होते. मात्र न्यायालयात आरोप पत्र दाखल होण्यास तब्बल वर्ष उजाडलं होतं. त्यातही पुढे नेमकं काय झालं याचा थांगपत्ता नाही. विशेष म्हणजे मुंबईत फौजफाटा घेऊन फिरणारे NIA अधिकारी जेव्हा पुलावामातील हल्ल्यासंदर्भात चार्जशीट न्यायालयात फाईल करण्यास गेले होते त्यावेळी एक व्यक्ती उपस्थित होती. त्यामुळे गरजेनुसार आणि सोयीनुसार मॅनपावर पुरवली जाते का अशी शंका व्यक्त होतं आहे.

सध्याचा विषयाला अनुसरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपाला टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, ‘पुलवामा हल्ल्यापेक्षा अंबाणीच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांची चौकशी महत्वाची…हम दो हमारे दो..!!

 

News English Summary: Mumbai Congress president Bhai Jagtap has slammed the BJP over the current issue. In this regard, while tweeting, he has said that, ‘The investigation of the explosives found near Ambani’s house is more important than the Pulwama attack.

News English Title: Mumbai Congress president Bhai Jagtap tweeted over Pulawama attacked NIA case news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BhaiJagtap(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या