11 May 2025 3:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 11 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | खुशखबर! मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये, जोरदार तेजीचे संकेत - NSE: RPOWER NBCC Share Price | 28 टक्के कमाईची संधी मिळतेय, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

परमबीर सिंग, सचिन वाझे तर खूपच लहान नावं | यामागे कोण बड्या हस्ती आहेत? - फडणवीस

Devendra Fadnavis, Sachin Vaze, Mumbai Police

नवी दिल्ली, १७ मार्च: महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्ली भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना सेवेत परत का घेण्यात आलं, असा सवाल महाराष्ट्र सरकारला केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सर्वांना माहिती आहे की, जी घटना मुंबईत घडली. उद्योगपती मुकेश अंबनी यांच्या घरासमोर ज्याप्रकारे जिलेटीन कांड्याने भरलेली एक स्कॉर्पिओ आढळून आली व त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्या सर्वांसमोर आहेत. त्यानंतरच्या घटनांमधील सर्वात मोठी कडी मनसुख हिरेन यांचा ज्या प्रकारे खून केला जातो. या सर्व गोष्टी मुंबई व महाराष्ट्राच्या इतिहासात या अगोदर कधीच घडल्या नाहीत. आम्ही ९० च्या दशकात राजकारणाचे गुन्हेगारीकरणाचा महराष्ट्रात अनुभव घेतला होता. तशाचप्रकारची परिस्थिती आणि आता तर संरक्षण करणारेच अशाप्रकारे गुन्हे करत असतील, तर मग संरक्षण कोण करणार हा प्रश्न आहे.

मुंबई पोलीस दलातील दोन पोलिस अधिकाऱ्यांना हटवून सचिन वाझेंना क्राइम इंटेलिजन्स युनिटच्या प्रमुखपदी नेमण्यात आलं. सीआयईचे प्रमुख म्हणून नाही तर वसुली अधिकारी म्हणून वाझेंना नेमलं. मी गृहमंत्री असताना सचिन वाझेना सेवेत परत घेण्यास नकार दिला होता. वाझेनं मनसुख हिरेन यांच्याकडून स्कॉर्पिओ खरेदी केली होती पण पैसे दिले नव्हते. हिरेन यांनी पैसे किंवा गाडी परत देण्यास सांगितलं होतं, असं देखील यावेळी देवेन्द्र फडणवीस म्हणाले.

परमबीर सिंग व सचिन वाझे तर खूपच लहान नावं आहेत. यामागे कोण बड्या हस्ती आहेत, त्यांची नावं समोर यायला हवीत. सचिन वाझेंना वापरणारी माणसं सरकारमध्ये बसलेले आहेत, त्यांची चौकशी कोण करणार?” असा सवाल देखील फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.

 

News English Summary: Leader of Opposition in the Maharashtra Legislative Assembly Devendra Fadnavis held a press conference at the BJP office in Delhi. Devendra Fadnavis has asked the Maharashtra government why Sachin Vaze was recalled.

News English Title: Devendra Fadnavis held a press conference at the BJP office in Delhi over Sachin Vaze case news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या