6 May 2025 9:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

राज्यावर कोरोना संकट | राष्ट्रवादीच्या आमदाराने उभारलं ११०० बेडचं कोविड सेंटर | १०० बेड्सना ऑक्सिजन सुविधा

NCP MLA Nilesh Lanke

पारनेर, १७ एप्रिल: राज्यात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येते असून, रूग्ण मृत्यूमध्येही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउन देखील जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील करोनाबाधितांची संख्या ही वाढल्याचे समोर येत आहे. आज दिवसभरात राज्यात ६३ हजार ७२९ करोनाबाधित वाढले असून, ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातीलर मृत्यू दर १.६१ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५९ हजार ५५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

दरम्यान, आज ४५ हजार ३३५ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३०,०४,३९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.१२ टक्के एवढे झाले आहे.

एकाबाजूला राज्यातील स्थिती कोरोनामुळे बिघडलेली असताना दुसऱ्या बाजूला काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांना लोकांच्या मदतीचं आवाहन केलं होतं. आता त्याच आवाहनाला संकट गडद झाल्यावर प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे शरदचंद्र आरोग्य मंदिर येथे ११०० बेड कोविड सेंटर सुरू केलं आहे. विशेष म्हणजे यामधील १०० बेड्सना ऑक्सिजनची सुविधा आहे.

तसेच कोविड सेंटरसाठी आमदार लंके यांनी नागरिकांना अन्नदान व विविध सुविधांसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत तालुक्यातून १७ लाख रुपये रोख स्वरूपात जमा झाले आहेत. मुंगशी गावाकडून ५ टन धान्य व ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.

 

 

News English Summary: On the one hand, the situation in the state has deteriorated due to the corona, on the other hand, a few days ago, Sharad Pawar had appealed to the party leaders to help the people. Now the same call is beginning to get a response as the crisis darkens. NCP’s Parner MLA Nilesh Lanka has started a 1100-bed covid center at Sharad Chandra Arogya Mandir in Bhalwani. What is special is that 100 of these beds have oxygen facility.

News English Title: NCP MLA Nilesh Lanke build a Covid center of 1100 beds with 100 oxygen beds facility at Parner constituency news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या