1 May 2025 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN
x

Health first | पेरू आहे आरोग्यासाठी लाभदायक फळ । सविस्तर वाचा

benefits of guava

मुंबई २० एप्रिल : पेरू हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पेरूमध्ये फायबर आणि पाणी जास्त प्रमाणात असते. फक्त पेरुच नाहीतर पेरुच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ज्यामुळे गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकतात.

थंडीच्या दिवसांमध्ये पेरू खाणं आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. पेरूमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन असतात, जे शरीराला आरोग्यपू्र्ण राहण्याच मदत करते. पेरू हृदयासंबंधी आजारांवर खूप उपयुक्त ठरतात. पेरू या फळात जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असतात. म्हणून हे फळ खाणे त्वचा आणि केस या दोहोंवरही चांगले परिणाम करते.

फॉलिक ऍसिड, पोटॅशिअम, तांबे आणि मँगनीज हे धातू पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. यामुळेच सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या अनेक कंपन्या पेरुचा वापर त्यांच्या उत्पादनात करतात. काही लोक पेरू ठेचून त्यात थोडे मध घालून ते मिश्रण चेहऱ्यावर लावतात. त्वचेला यामुळे उजाळा येऊ शकतो. पेरुंमध्ये ‘जीवनसत्व के’ मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे त्वचेवर उमटणारे चट्टे, डोळ्यांभोवती येणारी काळी वर्तुळं यांवर ते उपाय करता येतात.

पेरुचा गर नुसता शरीरावर लावल्यानेसुद्धा त्वचेतील अशुद्धी दूर होते. त्वचा नितळ होऊन तरुण आणि तेजस्वी दिसायला लागते. पेरू या फळात ८०% पाण्याचा समावेश असतो. हेच पाणी त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यात मदत करते. पेरू खाल्ल्यानं रक्तामध्ये साखरेचं प्रमाण कमी होतं. सोबतच पेरूचा अर्क रोज सकाळ-संध्याकाळ घेतल्यानं पचनक्रीया व्यवस्थित होते.

 

News English Summary: Eating this guava fruit is beneficial for your health. Guava is high in fiber and water. Not only Guava seeds but also Peruvian seeds are extremely beneficial for your health. This can cure gas, indigestion, stomach upset and constipation.

News English Title: Eating guava is beneficiary to our health news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या