Exit Poll 2021 | पश्चिम बंगालमध्ये ममता राज, तर तामिळनाडूत एनडीए'ला धक्का देत DMK सुसाट जाणार

नवी दिल्ली, ३० एप्रिल | पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी आठव्या टप्प्यातील मतदानासोबतच ५ राज्यांच्या निवडणुकांची सांगता झाली. निकालांसाठी २ मेची वाट पाहावी लागेल. कारण, गुरुवारी मतदानानंतर समाेर आलेल्या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्येही निकालांवर एकमत नाही. ४ माेठ्या संस्थांच्या पोलपैकी २ पोल ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला, तर एका एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमताचा अंदाज आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने तर दोन्ही पक्षांना जवळपास सारख्या जागा देत दोघांनाही बहुमत दर्शवले आहे. म्हणजे बंगालच्या मतदारांनी यंदा एक्झिट पोल संस्थांकडेही आपली ‘मन की बात’ सांगितलेली नसल्याचे दिसते. खरा निकाल २ मे रोजीच लागणार आहे. भाजप व तृणमूलने एक्झिट पोल्स आपल्याच बाजूने असल्याचा दावा केला आहे.
भाजपला बंगालमध्ये सत्ता न मिळूनही फायदा दिसतो. आसाममध्ये सत्ता मिळाली तरी नुकसान होईल. बंगालमध्ये २०१६ मध्ये भाजपने फक्त ३ जागा जिंकल्या होत्या, आता एक्झिट पोल १२०-१३० जागा देत आहेत. म्हणजे दीदींच्या किल्ल्याला खिंडार पडले आहे. आसाममध्ये सत्ता असूनही २ जागांचे नुकसान दिसत आहे. बंगालमध्ये एवढ्या जागा मिळाल्या तर त्या बळावर राज्यसभेत बहुमताची अपेक्षा आहे.
तामिळनाडूत प्रत्येक संस्थेच्या एक्झिट पोलमध्ये सत्तारूढ अद्रमुकच्या तुलनेत द्रमुकला अनेक पट जागा मिळत असल्याचे दिसते. अद्रमुक अंतर्गत भांडणामुळे त्रस्त होता, तर करुणानिधींशिवाय पहिलीच निवडणूक लढत असलेला द्रमुक स्टॅलिनच्या नेतृत्वात एकजूट दिसत आहे. राज्यात प्रादेशिक पक्षांचेच वर्चस्व कायम आहे. भाजपची अद्रमुकशी तर काँग्रेसची द्रमुकशी युती आहे.
Exit Poll 2021 pic.twitter.com/sCdNZIuhs1
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) April 30, 2021
पुद्दुचेरीच्या ३० जागांसाठी एक्झिट पोलमध्ये सीएनएक्सने एनडीएला १६-२० जागा, तर काँग्रेस+ ला ११-२० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बहुमतासाठी १६ जागांची गरज आहे.
केरळमध्ये पी. विजयन यांच्या नेतृत्वातील एलडीएफला पुन्हा सत्ता मिळेल असे दिसते. दोन पोलमध्ये एलडीएफला १०० पेक्षा जास्त जागा देण्यात आल्या आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला २० ते ५० जागांचा अंदाज वर्तवण्यात आला.
News English Summary: In West Bengal, the eighth phase of polling ended on Thursday with five state elections. We will have to wait till May 2 for the results. This is because there is no consensus on the results even in the exit polls of various organizations that came out after the polls on Thursday. Mamata Banerjee’s Trinamool Congress has a majority in two of the four polls, while the BJP has a majority in an exit poll.
News English Title: Exit Poll Assembly Elections 2021 predictions news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON