4 May 2025 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
x

Health First | जाणून घ्या तुरटीचे आरोग्यास लाभदायक गुणधर्म

benefits of alum

मुंबई, १ मे | पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुरटीचे अनेक फायदे आहेत. यात एंटी-बैक्टीरियल गुण आढळतात.

१. तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते. केस घनदाट करण्यासाठी कोमट पाण्यात तुरटी आणि डीप कंडिशनर समप्रमाणात मिसळून केसांना लावा. १५-२० मिनिटांनी थंड पाण्याने केस धुवा. आठवड्यातून एकदा हे करा.

२. दातांची समस्या असेल तर तुरटीच्या पाण्याने रोज चूळ भरावी. याने तोंडातील बॅक्टेरियांचा नाश होतो व तोंडाला दुर्गंध येण्याची समस्या देखील नाहीशी होते.

३. शेव्हिंग नंतर लोशन वापरण्याऐवजी तुरटी प्रभावी असते. याने त्वचा मऊ होण्यास मदत होते. शेव्हिंगनंतर तुरटीचा खडा फिरवावा व दोन मिनिटाने थंड पाण्याने चेहरा धुवुन घ्यावा.

४. केसांमधील ऊवा घालवण्यासाठी तुरटीच्या पावडरमध्ये थोडे पाणी मिसळून मिश्रण तयार करा. ही पेस्ट केसांना स्काल्पपासून लावा. ऊवांचा त्रास नाहीसा होईल.सनबर्न झालेल्या जागी एक कप पाण्यात दोन चमचे तुरटी पावडर टाका आणि प्रभावित जागी लावा. १० मिनिटांनी धुवून टाका.

५. बाथटबमध्ये तुरटीची पावडर टाकून स्नान केल्यास हृद्यासाठी उत्तम.

६ आर्थाराईट्समध्येही तुरटीचा फायदा होतो. गरम पाण्यात तुरटी टाकून शेक दिल्याने आराम मिळतो.

७. तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते. मॅग्नेशियममुळे शरीरातील हानिकारक पदार्थ निघून जातात. तणाव दूर करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून अंघोळ केल्याने आराम वाटतो. याने बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. याने शरीराला दुर्गध येत असल्याचा त्रास देखील दूर होतो.

८.शरीरावर एखादा घाव अथवा जखम झाली असेल तर त्यावर तुरटीचा उपयोग केल्याने जखम बरी होण्यास मदत होते. यामध्ये अस्ट्रिन्जन्ट आणि हेमोस्टेटिक गुण असल्याने जखम लवकर बरी होते. एका ग्लास गरम पाण्यात एक चमचा तुरटी पावडर मिसळून पाणी कोमट झाल्यावर जखम धुवावी.‍ दिवसातून दोन ते तीन वेळा असे करु शकता.

९. शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर त्या फिटकरीच्या पाण्याचा शेक दिल्याने दुखणे बरे होते.

News English Summary: Alum used to purify water has many benefits. It has anti-bacterial properties.

News English Title: There is so many uses of Alum news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या