3 May 2025 8:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

किती तो द्वेष? | निकम्मा पराक्रम PM केअरचा, पण भातखळकरांना व्हेन्टिलेटर्सचा मूळ विषय समजला नाही?

BJP MLA Atul Bhatkhalkar

मुंबई, ०८ मे | भाजपचे अभ्यासू राजकारणी सध्या कोणत्या विषयात हात घालून आणि विषय समजून न घेता आदळआपट करतील हे सांगता येणार नाही. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील पुन्हा तसाच प्रकार केला आहे. नाशिकसाठी पीएम केअर फंडातून मिळलेल्या ६० व्हेन्टिलेटर्सबाबत विषय समजून न घेताच त्यांनी हास्यास्पद ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे कि, “केंद्र सरकारच्या नावाने रोज ठणाणा करायचा आणि जे मिळालंय त्याची अशी नासाडी करायची तूर डाळ असो वा व्हेंटिलेटर….ठाकरे सरकार, निकम्मा कारभार.

एकीकडे राज्यात प्राणरक्षक प्रणालीअभावी (व्हेंटिलेटर्स) रुग्ण मरत असताना नाशिकमध्ये प्रशासनाच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा नमुना समोर आला आहे. नाशिकमध्ये व्हेंटिलेटर बेड वेळेवर मिळत नसल्याने अनेक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होत असताना, दुसरीकडे मात्र नाशिकला पीएम केअर फंडातून 60 व्हेंटिलिटर मिळूनही ते ‘जोडणी अभावी’ अजून ही बिटको रुग्णलयात धूळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

केंद्र सरकारने नाशिकसाठी व्हेंटिलेटर तर पाठवले, मात्र व्हेंटिलेटर जोडण्यासाठी लागणारे आवश्यक सुटे पार्ट्स (कनेक्टर) सोबत पाठवण्यातच आले नाही. हे सुटे पार्ट मिळालेच नसल्याने पाठवलेले 60 व्हेंटिलेटर्स अक्षरशः धूळ खात पडून आहेत. विशेष म्हणजे शहरात एकीकडे एका एका व्हेंटिलेटरसाठी रुग्ण तडफडत आहेत. असं असताना तब्बल 60 व्हेंटिलेटर फक्त प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि निष्काळजीपणामुळे पडून असल्याचं बघायला मिळत आहे. या घटनेतून एकूणच केंद्रातील प्रशासनाचा अर्धवट कारभाराचा पर्दाफाश झालाय.

याबाबत मनपा आयुक्तांना जाब विचारला असता त्यांनी या सगळ्याचे खापर संबंधित कंपनीवर फोडले. त्यानंतर प्रथेप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारणही रंगले. मात्र, या सगळ्यात या व्हेंटिलेटर्सची जोडणी केल्याशिवाय रुग्णांचे जीव वाचवता येतील, असा विचार अद्याप प्रशासनाच्या मनात आलेला नाही.

 

 

News English Summary: It is not possible to say on which subject the learned BJP politicians will now clash without understanding the subject. BJP MLA Atul Bhatkhalkar has done the same again. He has made a ridiculous tweet about the 60 ventilators received from PM Care Fund for Nashik without understanding the subject.

News English Title: BJP MLA Atul Bhatkhalkar tweet on Ventilators received to Nashik through PM Care Fund news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या