4 May 2025 1:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

कोरोना आपत्तीतील मोदींच्या मेहनतीवर भाजप प्रसारमाध्यम समन्वयकाचा लेख | भाजप नेत्यांकडून शेअर सपाटा

India corona pandemic

नवी दिल्ली, १२ मे | देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून दोन लाख लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून अनेकांनी त्यावर यशस्वीरित्या मात केली आहे. याच दरम्यान दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशात कोरोनाचा वेग थोडा मंदावताना पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोनाचा वेग मंदावत असताना काही राज्यांमध्ये मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. नव्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

कारण दुसरीकडे यूपी-बिहारसारखी काही राज्ये सर्वाधिक टेस्ट केल्याचा दावे करतात, मात्र लोकसंख्येशी प्रमाण बघता ही दोन्ही राज्ये टॉप-२० मध्येही येत नाहीत. डब्ल्यूएचओनुसार, संसर्गाचा दर ५% पेक्षा जास्त असल्यास स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे समजले जाते. ३३ कोटी लोकसंख्येच्या अमेरिकेत ४३ कोटी टेस्ट झाल्या आहेत. १३० कोटींच्या भारतात केवळ ३० कोटी टेस्ट झाल्या आहेत. अमेरिकेने संसर्गाचा दर कधीही १५% वर जाऊ दिला नाही. भारतात मात्र तो २३% इतका झाला आहे.

भारतात मागील ऑक्टोबर महिन्यात सापडलेला कोरोनाचा बी.१.६१७ हा उत्परिवर्तीत विषाणू वेगाने पसरत असून त्यामुळे जगभरातच जोखीम निर्माण झाली आहे. वेगाने पसरण्याच्या क्षमतेमुळे हे उत्परिवर्तन जागतिक चिंतेचा विषय असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे.

दरम्यान, देशातील विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर न देता मोदी कोरोनासंदर्भातील काम करत असल्याचा दावा या लेखामधून करण्यात आला असून तो लेख भारतीय जनता पक्षाचे मंत्री सोशल नेटवर्किंगवर शेअर करताना दिसत आहे. हा लेख भाजपाचे प्रसारमाध्यम समन्वयक असणाऱ्या सुदेश वर्मा यांनी लिहिला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख असणाऱ्या अमित मालवीय यांनी हा लेख शेअर केला आहे. “कोणाच्या तरी मृत्यूची बातमी किंवा रिकव्हरी होत नसल्याच्या बातम्या दाखवल्या जातात. मात्र आपल्याला ठाऊक आहे का ८५ टक्क्यांहून अधिक लोक घरीच ठीक होत आहेत. केवळ ५ टक्के लोकांची परिस्थिती चिंताजनक असून त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. मात्र देशात सध्या रिकव्हरी आणि डेथ रेटवर वाद सुरु आहे. या साथीसाठी कोणाला जबाबदार ठरवलं जावं यावर वाद सुरु आहे,” असं मालवीय यांनी म्हटलं आहे.

दुसरी लाट एवढी भयानक असेल याचा कोणाला अंदाज नव्हता, तर यासाठी मोदींना जबाबदार ठरवणं योग्य आहे का?, सुप्रीम कोर्टाने ३० एप्रिल रोजी ७० वर्षांमध्ये देशात पुरेशी आरोग्य व्यवस्था उभारण्यात आली नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळेच परिस्थिती एवढी गंभीर झालीय,” असा दावा सुदेश यांनी केलाय. “२०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी देशात १४ नवीन एम्स रुग्णालये सुरु करण्याचं ठरवलं. देशभरामध्ये १५७ मेडिकल कॉलेज सुरु करण्याची परवानगी दिली. २०१४-१५ मध्ये २१५ खासगी आणि १८९ सरकारी मेडिकल कॉलेज होते. २०१९ मध्ये २७९ सरकारी आणि २६० खासगी कॉलेज झाली. २०१४ मध्ये देशात एमबीबीएसच्या ५० हजार जागा होत्या. सहा वर्षांमध्ये ३० हजार जागा वाढवण्यात आल्या.” असं या लेखात म्हटलं आहे.

 

News English Summary: If international media questions us, so what? We will create our own international sounding websites to ensure propaganda continues said Shivsena MP Priyanka Chaturvedi

News English Title: Several union ministers share article by BJP member Sudesh Varma praising Modi hard work to tackle Covid news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या