2 May 2025 7:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

हे कुशासनामुळेच भोगतोय हे लोकांना कळतंय | आशा आहे भारतीय अमेरिकन मतदारांपेक्षा जास्त चातुर्य दाखवतील - अर्थतज्ज्ञ कौशिक बसू

India corona pandemic

नवी दिल्ली, १४ मे | कोरोना महामारी येऊन एक वर्षा लोटले आहे. या काळात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे, पण यातील अनेकांच्या मृत्यूची सरकारी आकडेवारीत नोंदच झालेली नाही. असे यामुळे, कारण अनेक मोठ्या देशांनी मृतांचा खरा आकडा जगापासून लपवला असल्याचा दावा वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीच्या हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन इंस्टीट्यूटच्या विश्लेषणात करण्यात आला आहे. यात सांगितल्यानुसार, रशियात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी सरकारी आकडेवारीपेक्षा 5 पट जास्त आहे. तसेच, भारत आणि मेक्सिकोमध्येही सरकारी आकडेवारीपेक्षा 2 पट जास्त मृत्यू झाले आहेत. तर संपूर्ण, जगात सरकारी आकडेवारीपेक्षा 113% जास्त मृत्यू झाले आहेत.

दुसरीकडे देशात रेमडीसीवीर, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स आणि लस अशा सर्वच विषयात केंद्र सरकारकडून गोंधळ असल्याचं पाहायला मिळतंय. कोरोना आपत्तीत जवाबदारी जरी राज्यांवर टाकण्यात आली असली तरी कोरोना संबंधित रेमडीसीवीर, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स आणि लस अशा सर्वच महत्वाच्या विषयांचा ताबा आणि नियंत्रण मोदी सरकारने स्वतःकडे ठेवले आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर प्राप्त झालेली परदेशी मदत नेमकी गेली कुठे याचा कोणताही ठावठिकाणा नाही. त्यामुळे देशात घडत असलेल्या ढिसाळ नियोजनाला केंद्र सरकारच जवाबदार असल्याचं सामान्य लोकांना देखील समजू लागलं आहे. त्यात देशातील सर्वोच्य नेतृत्व कोरोनाची दुसरी लाट असताना सुपर स्प्रेडर प्रमाणे प्रचारात मग्न होते असा थेट घणाघात विदेशातील प्रसार माध्यमांनी केला होता.

दरम्यान, देशातील याच चिघळणाऱ्या कोरोना परिस्थितीला अनुसरून जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ यांनी एक ट्विट करताना मोदी सरकारला इशारा देताना, हा विषय हाताळण्यास केंद्र सरकार अपयशी ठरल्याचं म्हटलंय. यासंदर्भात ट्विट ट्विट करताना कौशिक बसू यांनी म्हटलंय की, “भारतातील मत बदलत आहे. कुशासनामुळेच देश भिगतोय हे लोकांना जाणवत आहे. येथे नेहमीच अंधनिष्ठता राहील आहे. इथे उत्तर कोरियाचे लोक आहेत ज्यांना वाटतं की त्यांचा देश सर्वोत्कृष्ट राष्ट्र आहे. आशा आहे की भारतीय (अमेरिकन मतदारांप्रमाणे) जास्त चातुर्य दाखवतील.

 

News English Summary: Opinion in India is changing. People realize the nation’s suffering because of misgovernance. There will always be some blind loyalty-there are North Koreans who believe theirs is the bestrun nation. Hope lies in the fact Indians (like US voters) are showing greater intelligence said Kaushik Basu.

News English Title: Economist Kaushik Basu gave indication about changing situation in Nation after corona pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या