2 May 2024 2:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
x

रसायनीतल्या एचओसी कंपनीत प्रचंड वायुगळती, शेकडो माकडं आणि पक्षी मृत्युमुखी

पनवेल : रसायनी इथल्या पाताळगंगा परिसरात असलेल्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल कंपनीतून प्रचंड प्रमाणात वायुगळती झाल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री ९.४५ च्या सुमारास सदर घडना घडल्याचे समजते. दरम्यान, या वायुगळतीमुळे शेकडो जनावरं आणि पक्षी मृत्युमुखी पडल्याचे समजते.

हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल म्हणजे एचओसी कंपनी ही अमेरिकेतील नामांकित संशोधन संस्था इस्रोसाठी इंधन निर्मितीचं काम करते. १३ डिसेंबरला रात्री या कंपनीच्या इंधनाच्या टाकीतून ही मोठ्या प्रमाणावर वायुगळती होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील असंख्य मुक्या पशू-पक्ष्यांना याचा फटका बसला. तसेच यामध्ये कंपनीतले २ वॉचमन सुद्धा जागीच बेशुद्ध पडले होते. त्यानंतर कोणतीही वाच्यता होऊ नये ताबडतोब कंपनी बंद करण्यात आली असून आणि कंपनीचा केवळ एक प्लांट सुरू ठेवण्यात आला.

धक्कादायक म्हणजे हे प्रकरण कंपनीवर शेकू नये म्हणून २८ वानरांसह ४८ मृत्युमुखी पडलेल्या माकडांचा एचओसी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणालाही थांगपत्ता न लागू देता विल्हेवाट लावल्याचे समजते. दरम्यान, या घटनेनं प्राणी मित्रांमधून मोठा रोष व्यक्त करण्यात येत आहे. यात भर म्हणजे रसायनीच्या जवळपास कर्नाळा हे प्रसिद्ध पक्षी अभयारण्य असून येथे अनेक दुर्मिळ पक्षी आढळतात आणि त्यातील अनेक दुर्मिळ पक्षांना सुद्धा या वायूगळतीचा फटका बसल्याचे समजते. परंतु कंपनीने हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यावर सरकार नक्की कोणती कारवाई करणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Sudhir Mungantiwar(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x