1 May 2024 4:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये ब्रेकआउट, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर Birlasoft Share Price | मालामाल होण्याची संधी! 633% परतावा देणारा शेअर चर्चेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली
x

JioPhone Recharge Plans | तुम्ही जिओ सिमकार्ड वापरता? | रिचार्ज प्लान्स मध्ये तब्बल इतकी वाढ

Jio Recharge Plans

Jio Recharge Plans | भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. ‘ईटी नाऊ’च्या वृत्तानुसार कंपनीने जिओफोनच्या टॅरिफमध्ये तब्बल २० टक्के वाढ केली आहे. रिपोर्टनुसार, कंपनीकडे 10 कोटींपेक्षा जास्त जिओफोन युजर्स आहेत.

कंपनीने आता २८ दिवसांची वैधता असलेल्या १५५ रुपयांच्या प्लानची किंमत १८६ रुपये केली आहे. याच 28 दिवसांच्या वैधतेसह 185 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 222 रुपये करण्यात आली आहे, ज्यामध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. त्याचप्रमाणे 336 दिवसांच्या 749 रुपयांच्या प्लॅनची किंमत 899 रुपये ठेवण्यात आली आहे.

हा प्लान १५० रुपयांपर्यंत महागडा :
याआधी कंपनीने 749 रुपयांचा प्लॅन 150 रुपयांनी महाग केला होता. खरं तर, जिओफोन खरेदी करण्यासाठी ग्राहक 1999 रुपये, 1499 रुपये आणि 749 रुपयांचा पर्याय निवडू शकतात. मात्र, कंपनीने ७४९ रुपयांच्या प्लानची किंमत ८९९ रुपये केली होती.

जिओफोनचे सध्याचे युजर्स :
जिओफोनचे सध्याचे युजर्स असलेल्या ग्राहकांना ही ऑफर लागू होणार आहे. जर त्याला नवीन जिओफोन खरेदी करायचा असेल तर 899 रुपयांमध्ये त्याला जिओ फोन मिळेल, तसेच 1 वर्षाचा अनलिमिटेड प्लान मिळेल. यात वर्षभर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह एकूण २४ जीबी डेटा मिळतो. जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: JioPhone Recharge Plans price hiked check details here 14 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x