27 April 2024 9:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

PPF Calculator | मोठा परतावा देणारी सरकारी योजना, परताव्याची 100 टक्के हमी, 1 कोटी परताव्यासाठी किती वेळ लागेल?

PPF calculator

PPF Calculator | PPF ही सरकारची जोखीम विरहित आणि हमखास परतावा देणारी योजना आहे. या योजनेद्वारे तुम्ही करोडोंचा परतावा मिळवू शकता. तुम्ही या योजनेचे PPF खाते जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता.

पोस्ट ऑफिस पीपीएफ कॅल्क्युलेटर:
आपण नेहमीच अश्या योजना शोधत असतो ज्यात हमखास परतावा मिळेल, अशीच एक लहान बचत योजना म्हणजे, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी यालाच आपण पीपीएफ असे म्हणतो ही योजना गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची संधी देते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा देखील मिळतो. या योजनेचा 15 वर्षांचा मुदत पूर्ती कालावधी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देते. त्याच वेळी, इतर सर्व योजनांच्या तुलनेत या योजनेत व्याज परतावा देखील चांगले मिळत आहे. PPF ही सरकारची जोखीम विरहित आणि हमखास परतावा देणारी योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही करोडपती देखील बनू शकता. तुम्ही PPF खाते जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते.

गुंतवणुकीचे व्याज आणि फायदे :
गेल्या काही वर्षांत पीपीएफवरील व्याज वेळोवेळी कमी झाले आहे, परंतु तरीही ते सध्या वार्षिक 7.1 टक्के ठरवण्यात आले आहे. विशेषतः नोकरदार वर्गात ही अतिशय लोकप्रिय योजना आहे. बँकेच्या बचत खात्यात पैसे ठेवल्यास 3 ते 3.5 टक्के वार्षिक व्याज मिळतो तर मुदत ठेव अर्थात FD चे दरही तुलनेत कमी आहेत. या योजनेचा आणखी एक फायदा असा आहे की येथे मिळणारे परतावे इक्विटींप्रमाणे बाजाराशी संबंधित नाहीत. अनिश्चिततेच्या परिस्थितीतही, निश्चित व्याजानुसार परतावा दिला जातो. तर भांडवली बाजारातील गुंतवणूक बुडण्याचा धोका जास्त असतो. ही योजना पोस्ट ऑफिस स्कीम असल्यामुळे इथली तुमची प्रत्येक ठेवही सुरक्षित आहे आणि परतावा ही हमखास मिळणार हे नक्की.

1 कोटी परताव्यासाठी किती वेळ लागेल?
जर तुम्ही कमाल मासिक 12,500 रुपये या योजनेत गुंतवले तर ती एकूण रक्कम वार्षिक 1.50 लाख रुपये असेल. त्यावर मिळणारा 7.1 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याज तुमची गुंतवणूक रक्कम आपोआप वाढवेल आणि 25 वर्षानंतर मुदत पूर्ण झाल्यावर तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम 1.03 कोटी रुपये परतावा मिळेल. तुमची 25 वर्षाची एकूण एकूण गुंतवणूक 37,50,000 रुपये असेल आणि त्यावर मिळणारा व्याज परतावा लाभ 65,518,000 रुपये असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PPF calculator returns on long term investment on 4 August 2022.

हॅशटॅग्स

#PPF Calculator(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x