5 May 2024 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

SIP Calculator | म्युच्युअल फंडातून बंपर परतावा कमावण्यासाठी या टॉप 4 योजना करतील मदत, भरघोस कमाई करू शकाल

SIP Calculator

SIP calculator | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी आजकाल लहान गुंतवणूकदारांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय योजना आहे. मागील काही वर्षांत म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जबरदस्त वेगाने वाढत आहे. याचे कारण म्हणजे तुम्ही या योजनेत फार कमी पैसे गुंतवणूक करून भरघोस परतावा कमावू शकता. यामुळे तुमच्या खिशावर कोणताही आर्थिक भार पडत नाही आणि तुम्ही दीर्घकाळात मोठा फंड तयार करू शकता.

बंपर परतावा दिलेल्या SIP योजना :
जर तुम्ही सध्या कुठेतरी गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि तुम्हाला हवा तसा परतावा देणारी गुंतवणूक योजना भेटली नसेल तर आम्ही तुम्हाला या लेखात सर्वोत्तम कामगिरी करणारे काही SIP म्युच्युअल फंड सुचवत आहोत. तुम्ही त्यात गुंतवणूक करू शकता आणि दीर्घकाळात बंपर परतावा मिळवू शकता. या SIP योजनानी मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे.

ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड :
ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंडाने मागील तीन वर्षांत तब्बल 42.30 टक्के नफा कमवला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 6,887 कोटी रुपये असून त्याचे निव्वळ मालमत्ता मूल्य NAV 163 कोटी रुपये आहे. रिसर्च फर्म क्रिसिलने या म्युचुअल फंडाला 3 स्टार रेटिंग दिले आहे. इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड या त्याच्या टॉप च्या 5 गुंतवणूक केलेल्या कंपन्या आहेत.

टाटा डिजिटल इंडिया फंड :
टाटा डिजिटल इंडिया म्युचुअल फंडाने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 39.4 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 3842 कोटी रुपये असून त्यांचे निव्वळ मालमत्ता मूल्य 38.2 कोटी रुपये आहे. या फंडाचे खर्चाचे प्रमाण 2.02 टक्के आहे. यामध्ये तुम्ही किमान 500 रुपयांपासून SIP गुंतवणूक सुरू करू शकता. इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेड या फंडाच्या टॉपच्या गुंतवणूक केलेल्या कंपन्या आहेत.

आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया फंड :
आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया या म्युचुअल फंडाने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 40.5 टक्के इतका जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. या फंडाची एकूण मालमत्ता 2658 कोटी रुपये असून निव्वळ मालमत्ता मूल्य 140 कोटी रुपये आहे. म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 2.19 टक्के आहे. या योजनेत तुम्ही फक्त 1000 रुपयांपासून SIP गुंतवणूक सुरू करू शकता. इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेड या म्युचुअल फंडाच्या टॉप च्या गुंतवणूक केलेल्या कंपन्या आहेत.

SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड :
एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंडाच्या मागील तीन वर्षांच्या परताव्याबद्दल माहिती घेतली तर असेल कळेल की त्याने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 36.6 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या फंडाची एकूण मालमत्ता 1891 कोटी रुपये असून निव्वळ मालमत्ता मूल्य 156 कोटी रुपये आहे. तुम्ही या म्युचुअल फंडात किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. त्याचे खर्चाचे प्रमाण 2.27 टक्के आहे. इन्फोसिस लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अल्फाबेट इंक., टेक महिंद्रा लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेड हे त्याचे टॉप गुंतवणूक केलेल्या कंपन्या आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SIP Calculator of top 4 Mutual funds given huge returns on 18 August 2022.

हॅशटॅग्स

#SIP Calculator(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x