6 May 2024 11:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

LIC New Pension Plus Policy | एलआयसीची न्यू पेन्शन प्लस पॉलिसी लाँच, सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणुक फायद्याची

LIC New Pension Plus Policy

LIC New Pension Plus Policy | लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेडने (एलआयसी) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे तरुणांना त्यांच्या सेवानिवृत्तीचे नियोजन करण्यास मदत होईल. एलआयसीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विमा कंपनीने एलआयसी न्यू पेन्शन प्लस (प्लॅन क्रमांक 867) सुरू केला आहे.

नॉन-पार्टिसिपेटिंग, युनिट लिंक्ड, वैयक्तिक पेन्शन योजना :
५ सप्टेंबरपासून ग्राहकांसाठी ही पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. एलआयसीने म्हटले आहे की, ही नॉन-पार्टिसिपेटिंग, युनिट लिंक्ड, वैयक्तिक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये पेन्शनर पद्धतशीर आणि शिस्तबद्ध पद्धतीने बचत करून मोठा कॉर्पस तयार करण्यास मदत करतो. यामध्ये तुम्ही टर्म पूर्ण झाल्यावर अॅन्युइटी योजनेद्वारे नियमित उत्पन्न म्हणूनही त्याचं रूपांतर करू शकता.

प्रीमियम कसा भरावा:
एलआयसीने म्हटले आहे की, सिंगल प्रिमियम किंवा रेग्युलर प्रीमियम पेमेंट फ्रिक्वेन्सीसह तुम्ही ही पेन्शन योजना खरेदी करू शकता. पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीसाठी ग्राहकांना प्रीमियम भरावा लागेल. यामध्ये प्रिमियमच्या रकमेची मर्यादा ग्राहकांसाठी वेगळी असू शकते.

पॉलिसीमधील एनएव्हीची गणना दररोज केली जाईल आणि गुंतवणूकीची कामगिरी, प्रत्येक फंड प्रकारचे फंड व्यवस्थापन शुल्क यावर आधारित असेल.

पॉलिसी ऑनलाइन देखील घेऊ शकता :
एलआयसीने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, ग्राहक ही नवीन पेन्शन पॉलिसी एलआयसी न्यू पेन्शन प्लस (प्लॅन नंबर 867) ऑफलाईन एजंटकडून खरेदी करू शकतात. यासोबतच ग्राहकांना एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन खरेदी करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: LIC New Pension Plus Policy.

हॅशटॅग्स

#LIC New Pension Plus Policy(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x