4 May 2024 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

Mutual Fund SIP | 18 वर्षात 10 लाख रुपये गुंतवणुक करून मिळेल 2.5 कोटी रुपये परतावा, हा फंड तुमच्यासाठी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग ठरेल

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना नियमित आणि संयमी गुंतवणूक करून जबरदस्त परतावा आणि नफा मिळू शकतो. म्युचुअल फंडात गुंतवणूक करणारे म्युचुअल फंड कंपनी अशा शेअर्सवर लक्ष ठेवतात, जे त्यांच्या वास्तविक मूल्यापेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही दीर्घ मुदतीत जबरदस्त फंड तयार करून भरघोस परतावा मिळवू शकता.

शेअर बाजार असो किंवा म्युच्युअल फंड असो, गुंतवणूकदाराला त्याच्या पैशावर जबरदस्त परतावा कमवायचा असतो. तुमच्या गुंतवणूक केलेल्या पैशावर चांगला परतावा मिळवण्याचा चांगला मार्ग म्हणजे चांगल्या आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणे. जगातील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे हे देखील या गुंतवणूक क्षेत्रातील एक मोठे दिग्गज आहेत.

व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग :
“व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग” म्हणजे अशा कंपन्यांचे स्टॉक शोधणे जे त्यांच्या वास्तविक मूल्यापेक्षा कमी किमतीवर खाली पडून ट्रेडिंग करत आहेत. म्हणजेच, कंपनीची मजबूत स्थिती असली पाहिजे पण, त्याचे शेअर्स खाली पडून ट्रेड होत आहे. अशा शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यास दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळण्याची पूर्ण खात्री असते.

मनी मॅनेजमेंट इंडियाने मॉर्निंगस्टार वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या डेटाच्या आधारे एका अहवालात म्हटले आहे की, देशातील बहुतांश इक्विटी फंड हे सकारात्मक वाढीवर आधारित परतावा देत आहेत. याचा अर्थ या म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळाला आहे. ICICI प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी म्युचुअल फंडाने सुरुवातीपासूनच आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे.

तब्बल 20 टक्के परतावा :
जर तुम्ही ICICI प्रुडेंशियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडच्या स्थापनेच्या वेळी त्यात 10 लाख रुपये गुंतवले असते, तर 31 जुलै 2022 रोजी तुमच्याकडे तब्बल 2.5 कोटी रुपये रक्कम जमा झाली असती. मागील 18 वर्षांत या म्युचुअल फंडाची निव्वळ मालमत्ता मूल्य वाढून 24,694 कोटी रुपये झाली आहे. मूल्य श्रेणीतील एकूण AUM च्या तुलनेत या म्युचुअल फंड चा वाटा 30 टक्के आहे. या कालावधीत वार्षिक परतावा सुमारे 19.7 टक्के होता. या काळात तर निफ्टी 50 ने आपल्या गुंतवणूकदारांना 15.6 टक्के परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही या योजनेत 10 लाख रुपये गुंतवणूक केली असती तर 31 जुलैपर्यंत एकूण 1.30 कोटी रुपये परतावा मिळाला असता.

SIP व्हॅल्यू गुंतवणुकीमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास मजबूत परतावा कमावता येतो. त्यामुळे SIP द्वारे गुंतवणूक करणार्‍यांसाठी हा एक जबरदस्त गुंतवणूक पर्याय असू शकतो. म्युचुअल फंड गुंतवणूक सुरू केल्यानंतर जर तुम्ही एसआयपीद्वारे मासिक 10,000 रुपये गुंतवणूक केली असती, तर आतापर्यंत तुमची गुंतवलेली एकूण रक्कम तब्बल 21.6 लाख रुपये झाली असती. 31 जुलै 2022 पर्यंत, ही एकूण रक्कम परताव्यासह वार्षिक 17.3 टक्के व्याज दराने 1.20 कोटी रुपये झाली असती.

संयमी गुंतवणूक करोडपती बनवेल :
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी फंडाचे व्यवस्थापक म्हणतात की व्हॅल्यू म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करताना संयम राखण्याचा सल्ला देतात. कारण जेव्हा गुंतवणूक मूल्य जेव्हा कमकुवत असते, तेव्हा समजून जा की बाजारात कमजोरी आली आहे. अश्यावेळी म्हणून, गुंतवणूकदारांनी संयम बाळगून गुंतवणूक करावी. आणि जेव्हा तेजीचे चक्र फिरते, तेव्हा संयमाचे फळ मिळते याला इतिहास साक्षीदार आहे. मूल्य अनुकूल नसलेल्या परंतु दीर्घकालीन परतावा कमावून देण्याची क्षमता असलेल्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करावे.

याशिवाय, गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड निवडताना, एएमसी, फंडांची कामगिरी आणि कार्यपद्धती समजून घेणे खूप आवश्यक आहे. यावरून हा फंड इतर म्युचुअल फंडांच्या तुलनेत कधी आणि कसा कामगिरी करेल याची कल्पना येऊ शकते आणि आपण चांगले म्युचुअल फंड गुंतवणुकीसाठी निवडू शकतो. गुंतवणूक बाजारात “मूल्य गुंतवणुक” या सारख्या संज्ञा क्वचितच वापरले जातात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual Fund SIP for on long term investment benefits on 11 September 2022.

हॅशटॅग्स

#Investment Tips(142)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x