6 May 2024 10:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Multibagger Stocks | या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1 दिवसात दिला बंपर परतावा, गुंतवणूकदारांनी कमावले लाखो रुपये

Multibagger Stocks

Multibagger Stocks | 9 सप्टेंबर रोजी भारतीय गेमिंग क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीने शेअर बाजारात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. या स्टॉकमधून लोकांनी एका दिवसात तब्बल 16 टक्के नफा कमावला आहे. म्हणजेच जी समजा तुम्ही सकाळी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते, तर संध्याकाळी तुम्हाला 1 लाखवर 16 हजार रुपये नफा झाला असता.

नाझारा टेक्नॉलॉजी कंपनीचा स्टॉक शेअर – Nazara Technologies Share Price :
Nazara Technologies Ltd चा स्टॉक दिवसा अखेर (शुक्रवारी) सुमारे 11.17 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. 9 सप्टेंबर रोजी या कंपनीचा शेअर 73.95 अंकांनी वाढून मुंबई शेअर बाजारात त्याची किंमत 736 रुपयांवर पोहोचली होती. त्याच दिवशी या शेअरमध्ये 767.05 रुपयांची म्हणजेच 15.86 टक्क्यांपर्यंत जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. यापुढेही नजरा टेक्नॉलॉजीची वाढ होईल आणि त्याच्या शेअरच्या किमतीत भरघोस वाढ होईल, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

मार्च 2021 मध्ये नाझारा टेक्नॉलॉजी कंपनीचा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. त्यावेळी या शेअरची IPO किंमत 1,101 रुपये होती. हा स्टॉक सध्या त्‍याच्‍या IPO किंमतीच्‍या खूप खालील किमतीवर ट्रेड करत आहे. मात्र, यंदाच्या ऑगस्ट 2022 पासून नाझरा कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आता हा शेअर जबरदस्त रिकव्हरीच्या मार्गावर तेजीत पुढे जात आहे. 10 ऑगस्ट रोजी एका शेअरचे मूल्य फक्त 653 रुपये होते, ते आता वाढून तब्बल 735 रुपये झाले आहे. म्हणजेच महिनाभरात या स्टॉकमध्ये जवळपास 13 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांनीही या कंपनीत खूप मोठी गुंतवणूक केली होती. जून 2022 च्या तिमाहीत त्यांची गुंतवणूक हिस्सेदारी तब्बल 10 टक्के होती, म्हणजेच त्यांच्याकडे नाझारा टेक्नॉलॉजीचे तब्बल 65,88,620 शेअर्स होते.

नुकतीच कंपनीची एक बैठक झाली ज्यामध्ये नाझारा टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आणि एमडी यांनी असे विधान केले की, आम्ही या क्षेत्रात भारतात सर्वात आघाडीवर आहोत. आणि पुढे जाऊन आमची कामगिरी चांगली होईल याचा आम्हाला विश्वास आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नझारा कंपनीने तब्बल 14 मिलियन डॉलर खर्चून म्हणजेच सुमारे 82 कोटी रुपयांमध्ये वाइल्डवर्क्स कंपनी ऑफ अमेरिका ही कंपनी ताब्यात घेतली आहे. नाझारा टेक्नॉलॉजीचा संपूर्ण व्यवसाय गेमिंग आणि स्पोर्ट्स मीडियाचा आहे.

दोन महिन्यांत 50 टक्के परतावा :
जून 2022 मध्ये नझारा टेक्नॉलॉजीचा स्टॉक तब्बल 475 रुपयांपर्यंत खाली पडला होता. ही किंमत शेअरची आजपर्यंतची सर्वात नीचांकी किंमत आहे. 3 ऑगस्ट 2022 रोजी स्टॉकची किंमत तब्बल 710 रुपयांवर जाऊन पोहोचली होती. मागील दोन महिन्यांत शेअरची किंमत जवळपास 50 टक्क्यांनी वाढली आहे. शेअरची विक्रमी उच्चांक किंमत 1678 रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Nazara technology limited share price return on 11 September 2022

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x