30 April 2024 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार? RVNL Share Price | PSU शेअर मजबूत कमाई करून देतोय, अल्पावधीत 2200% परतावा दिल्यानंतर पुन्हा तेजीत येणार
x

Multibagger Stocks | या मल्टीबॅगर शेअरने 5608 टक्के परतावा दिला, पुढे किती रिटर्न मिळणार?, ब्रोकरेज फर्मचे मत जाणून घ्या

Multibagger Stock, SRF limited, Stock market, BSE, NSE, Investment, share price,

Multibagger Stocks | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक करून भरघोस परतावा कमावण्याची इच्छा असते. मल्टीबॅगर शेअर्स मधे गुंतवणूक करून तुम्ही खूप कमी काळात मोठा परतावा कमवू शकता. चालू वर्षात आपण पाहू शकता की शेअर बाजारात सतत घसरण होत आहे. अश्या वेळीही गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देणाऱ्या शेअरमध्ये केमिकल कंपनी एसआरएफ लिमिटेड अग्रणी आहे. या स्टॉकने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 57 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. सप्टेंबर 2012 मध्ये एसआरएफ लिमिटेडचा एक शेअर 45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये SRF चा शेअर 2569 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. हा स्टॉक मागील 10 वर्षांत 5608 टक्के वाढला आहे. याशिवाय, मागील एका वर्षात SRF च्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्के चा परतावा मिळवून दिला आहे. मागील पाच वर्षांतही ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 733 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.

1 लाख रुपयेवर 58 लाख परतावा :
SRF लिमिटेड चा स्टॉक मागील 10 वर्षात आपल्या भागधारकांना मल्टीबॅगर पेटवा देणारा एक अव्वल स्टॉक ठरला आहे. जर गुंतवणूकदारांनी सप्टेंबर 2012 मध्ये SRF च्या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 57 पटीने वाढून 57 लाख रुपये झाली असती. सप्टेंबर 2012 च्या किंमत पातळीच्या तुलनेत सध्या SRF च्या शेअरची किमती 5608 टक्के वाढलेली आपण पाहू शकतो. मात्र, कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये SRF च्या स्टॉकमध्ये 2 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती.

SRF बद्दल तज्ञांचे मत :
SRF च्या स्टॉकने मागील 10 वर्षांत आपल्या भागधारकांना वाढीव परतावा कमावून दिला आहे, असे असले तरी तज्ञांना वाटते आता ह्या स्टॉक मध्ये आणखी वाढ होणार नाही. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या शेअरला “न्यूट्रल रेटिंग” दिले आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, SRF च्या स्टॉकमध्ये सध्याच्या 2623 रुपये किमतीवरून 4 टक्क्यांची घसरण होऊ शकते. म्हणजेच पुढील काळात SRF चा स्टॉक 2510 रुपये घसरू शकतो असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्म चे म्हणनने आहे की, SRF पॅकेजिंग कंपनीने 2016 ते 2022 या काळात 21 टक्के आणि 39 टक्के चा EBIDTA CAGR नोंदवला होता. SRF कंपनीच्या आक्रमक उद्योग विस्तार धोरणामुळे आणि उद्योग वाढीमुळे ऑपरेटिंग मार्जिनमध्ये सुधारणा शक्य झाली आहे.

SRF चा उद्योग आणि व्यापार :
खाद्यपदार्थ उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स उद्योग आणि शाश्वत सोल्यूशन्समध्ये पॅकेजिंग मटेरियलची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेऊन, SRF आपला उद्योग वाढवण्याचा मजबूत प्रयत्न करत आहे. ब्रोकरेज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, “आर्थिक वर्ष 2022-24 मध्ये पॅकेजिंग मेटरियलच्या व्यवसायातून SRF 17 टक्के महसूल CAGR कमावण्याची अपेक्षा करत आहे. त्याच वेळी, EBIT मार्जिन आर्थिक वर्ष 2022 मध्ये 19.8 टक्के वरून आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये 18.2 टक्के पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. कंपनीच्या BOPET मार्जिनवर बराच दबाव दिसून आला आहे. SRF ने आर्थिक वर्ष 2022-24 या कालावधीत 18 टक्के/16 टक्के/20 टक्के ची महसूल/EBITDA/PAT CAGR नोंदवण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

कंपनी बद्दल सविस्तर :
1970 साली SRF लिमिटेड आपल्या मूळ कंपनी DCM मधून विभक्त झाली, आणि SRF ची स्थापना झाली. SRF ही एक वैविध्यपूर्ण रासायनिक उद्योग क्षेत्रात व्यापार करणारी कंपनी आहे. SRF कंपनी रेफ्रिजरंट गॅसेस, पॅकेजिंग फिल्म्स, तांत्रिक कापड आणि विशेष रसायनांची निर्मिती करते. कंपनी एकूण चार प्रकारचे उद्योग करते :

* कापड उद्योग – महसुलातील वाटा 17 टक्के,
* रसायने – महसुलातील वाटा 42 टक्के,
* पॅकेजिंग फिल्म – महसुलातील बता 38 टक्के,
* इतर उत्पादने – महदुलातील वाटा 3 टक्के.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks 0f SRF limited share price return on investment in 24 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x