2 May 2024 5:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Electronic Mart IPO | या IPO मध्ये फक्त 14224 रुपये गुंतवा आणि पैसा वाढवा, ऑक्टोबर 7 तारखेपर्यंत गुंतवणुकीची संधी, वाचा तपशील

Electronic Mart IPO

Electronic Mart IPO | शेअर बाजारात IPO येत जात असतात, पण त्यातील खूप IPO असतात जे आपल्या गुंतवणूकदारांना कडक नफा कमावून देतात. आतपर्यंत असे अनेक IPO बाजारात आले, जे प्रिमियम मध्ये सूचीबद्ध झाले, आणि गुंतवणूकदारांनी त्यातून भरघोस नफा कमावला. आज या लेखात आम्ही तुम्हाला अश्या एका IPO बद्दल माहिती देणार आहोत, जो आपल्यासाठी कमाईची सुवर्ण संधी घेऊन आला आहे. या IPO मध्ये तुम्हाला फक्त 14224 रुपये जमा करावे लागतील. IPO मध्ये अर्ज करण्यापूर्वी नेहमी गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घ्यावा. चला तर पाहू या नवीन IPO चा सविस्तर तपशील.

IPO चा सविस्तर तपशील :
बऱ्याच काळापासून शेअर बाजारात कमाई करून देणारा IPO आला नाही. गुंतवणुकदार आता IPO ची वाट पाहत आहेत जो त्यांचे पैसे दुप्पट तिप्पट वाढवतील. तुम्ही देखील अश्याच कमाई करून देणाऱ्या IPO ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शेअर बाजारात Electronic Mart India कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कंझ्युमर ड्युरेबल्स रिटेल चेन “Electronics Mart India” कंपनीचा IPO 4 ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO 7 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. तुम्ही 7 तारखेपर्यंत या IPO मध्ये पैसे लावू शकता. या IPO अंतर्गत, कंपनी आपले शेअर बाजारात विकून गुंतवणूकदारांकडून सुमारे 150 कोटी रुपये गोळा करणार आहे.

500 कोटी रुपयांचा IPO :
या IPO मध्ये “Electronics Mart India” कंपनी 500 कोटी रुपयांचा नवीन इश्यू खुल्या बाजारात विकणार आहे. जर तुम्हीही IPO मध्ये गुंतवणूक करून आपले पैसे वाढवण्याचा विचार करत असाल तर, Electronics Mart India चा IPO तुम्हाला जबरदस्त नफा कमावून देऊ शकतो.

IPO ची सविस्तर माहिती :
* किमान गुंतवणूक रक्कम मर्यादा : 14224 रुपये
* लॉट साइज : 254
* शेअर ची किंमत बँड : 56-59 रुपये प्रति शेअर
* IPO ओपनिंग तारीख : 4 ऑक्टोबर 2022
* IPO बंद होण्याची तारीख : 7 ऑक्टोबर 2022
* IPO चा आकार : 500 कोटी रुपये

IPO चा निधी कुठे वापरणार?
कंपनी या IPO मधून जी रक्कम जमा करणार आहे, कंपनी या पैशाचा वापर भांडवली खर्च आणि खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी करणार आहे. यासोबतच त्यातील काही रक्कम ही कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी वापरले जातील.

कंपनी बद्दल थोडक्यात माहिती :
Electronics Mart India Limited (EMIL) ची स्थापना 1980 साली पवन कुमार बजाज आणि करण बजाज यांनी केली होती. ही कंपनी ग्राहक टिकाऊ वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर म्हणून बजाज इलेक्ट्रॉनिक्स या नावाने सुरू करण्यात आली होती. कंपनीचा व्यवसाय खूप विस्तारलेला आहे. 2022 या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत कंपनीचे संपूर्ण भारतात 36 शहरांमध्ये 112 स्टोअर्स आणि आउटलेट आहेत. याशिवाय कंपनी ‘किचन स्टोरीज’ नावाने मल्टी-ब्रँड आउटलेट स्टोअर्स देखील चालवत आहे. किचन स्टोरीज या दुकानांत कंपनी स्वयंपाक घरात लागणारे गरजेच्या वस्तू विक्री करते.

News Title| Electronic Mart IPO Has opened for investment in stock market on 06 October 2022.

हॅशटॅग्स

Electronic Mart IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x