27 April 2024 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Hero MotoCorp E-Scooter | पेट्रोलच्या महागाईतून सुटका, हिरो मोटोकॉर्पची पहिली ई-स्कूटर आज लाँच होणार, फीचर्स जाणून घ्या

Hero MotoCorp E-Scooter

Hero MotoCorp E-Scooter | पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढत्या महागाईमुळे सगळेच त्रस्त झाले आहेत. तेलाच्या वाढलेल्या किमती आता कधीच कमी होणार नाहीत, हे सरकारच्या मनोवृत्तीतून स्पष्ट होते. अशा परिस्थितीत महागाईपासून दिलासा मिळवण्यासाठी लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. आज हिरो मोटोकॉर्पही आपली पहिली ई-स्कूटर (हिरो ई-स्कूटर) लाँच करणार आहे. कंपनी आपल्या ई-मोबिलिटी ब्रँड विदा अंतर्गत ही ई-स्कूटर लाँच करणार आहे. असा दावा केला जात आहे की लाँचिंगपूर्वी या स्कूटरची जवळपास 2 लाख किमी धावुन चाचणी करण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहकांना खरेदीनंतर कोणतीही अडचण येणार नाही.

ई-स्कूटरमध्ये दिसू शकतात हे फिचर्स :
कंपनीने अद्याप आपल्या ई-स्कूटरची (हिरो ई-स्कूटर) माहिती जाहीर केलेली नाही. पण मीडियातील माहितीनुसार, या स्कूटरमधील इलेक्ट्रॉनिक मोटर 3 किलोवॅटची पीक पॉवर आणि 115 एनएमचा टॉर्क जनरेट करू शकणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही ई-स्कूटर जवळपास 25 किमीपर्यंत विनाथांबा चालवता येईल, असं सांगण्यात येत आहे.

ग्राहकांना मिळणार बॅटरी स्वॅपिंगची सुविधा :
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हीरो मोटोकॉर्पची ई-स्कूटर बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानासह येणार आहे. यासाठी कंपनीने तैवानस्थित गोगोरोसोबत भागीदारी केली आहे. ही कंपनी बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग आणि स्वॅपिंग तंत्रज्ञानातील तज्ज्ञ मानली जाते. या तंत्रज्ञानाअंतर्गत युजर्संना स्कूटरची बॅटरी स्वत:च बदलता येणार आहे.
देशातील चार्जिंग स्टेशन वाढवण्यासाठी हिरो कंपनीने बीपीसीएलसोबत भागीदारीही केली आहे. या दोन्ही कंपन्या मिळून बंगळुरु, दिल्लीसह देशातील 7 शहरांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या पायाभूत सुविधा निर्माण करणार आहेत.

स्कूटरची किंमत इतकी असू शकते :
हिरोच्या पहिल्या ई-स्कूटरमध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट, एलईडी लॅम्प्स, स्मार्ट सेन्सर्स, फिक्स्ड सेटअप बार, सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग सिस्टम, हायड्रॉलिक डिस्क ब्रेक्स सारखे अॅडव्हान्स फीचर्स पाहायला मिळतील. कंपनीने आपल्या पहिल्या ई-स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही. मात्र या स्कूटरची किंमत 80 हजार ते एक लाख रुपयांदरम्यान असू शकते, असं मानलं जात आहे. बाजारात प्रवेश केल्यानंतर या ई-स्कूटरची टक्कर बजाज चेतक, ओला एस 1, ओकिनावा आणि टीव्हीएस आयक्युब यांच्याशी होणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Hero MotoCorp E-Scooter will be launch today check details 07 October 2022.

हॅशटॅग्स

#Hero MotoCorp E-Scooter(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x