29 April 2024 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?
x

Business Idea | तुम्ही कमीतकमी भांडवलात सुरू करू शकता हा व्यवसाय, अनेक तरुण यामध्ये मोठी कमाई करत आहेत

Business idea

Business Idea | कोरोना महामरीमुळे अनेकांच्या हातातल्या नोक-या गेल्या आहेत. त्यामुळे अनेक तरुन व्यवसायाच्या दिशेने आपले पाउल टाकत आहेत. सध्या प्रदूषण देखील जास्त प्रमाणात वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्लास्टीकवर बंदी आणली गेली. यामुळे सर्वच ठिकाणी वापरण्यात येणारे प्लास्टीक बंद झाले. मात्र याचा प्रदूषण रोखण्याबरोबरच एक चांगला परिणाम देखील झाला. तो म्हणजे अनेक नागरिकांना नव्याने व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली.

शासनाने डिस्पोजेबल पेपर कपचा पर्याय यावेळी समोर आणला आहे. त्यामुळे तुम्ही देखील या व्यवसायात जास्तीत जास्त नफा कमवू शकता. मार्केटमध्ये नव्याने काहीतरी करूपाहणा-या होतकरू तरूणांसाठी ही सुवर्ण संधी आहे. यात तुम्हाला शासनाकडून देखील आर्थिक मदत केली जाते.

व्यवसायाची खासीयत
या व्यवसायात विशेष बाब म्हणजे तुमच्याकडे कोणतेही भांडवल असताना देखील तुम्ही पेपर कपचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी शासन तुम्हाला मदत करते. खूप कमी पैसे वापरून तुम्ही या व्यवसायात जास्तीत जास्त नफा कमवू शकता. सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला यात मदत मिळते.

काय आहे मुद्रा योजना
केंद्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. व्यवसायाला अधिक चालना देणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेतून व्यवसायीकांना कर्ज दिले जाते. या योजनेची कोणत्याही व्यवसायात तुम्हाला चांगली मदत मिळते. तसेच यातील कर्जाच्या व्याजावर सबसिडी देखील आहे. यात तुम्हाला २५ टक्के रक्कम गुंतवावी लागते तर सरकार कडून ७५ टक्के कर्ज दिले जाते.

आवश्यक वस्तू
पेपर कपचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एका मशीनची आवश्यकता आहे. हे मशीन अहमदनगर, हैदराबाद. दिल्ली, आग्रा अशा अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. विविध मशीन ज्या ठिकाणी इंजिनीअर तयार करतात तिथेच हे मशीन बनवले जाते. व्यवसाय सुरू करण्यासाठी मशीन बरोबरच ५०० चैरस फूट क्षेत्रफळ देखील लागते. यात वीजे पासून लागणा-या सर्वच यंत्रसामग्रीसाठी १०.७० लाख रुपयांचा खर्च येतो. तसेच कामगारांचा खर्च पकडून तुम्हाला दरमहा ३५००० रुपये खर्च येईल.

गुंतवणूक आणि नफा
पेपर कपच्या व्यवसायात साधारणता ३.७५ लाख रुपये साधन सामग्रीवर खर्च होतील. तर वीज आणि सामग्रीचा वापर यावर ६००० रुपयांचा खर्च आहे. तसेत इतर खर्च २०,५०० रुपयांवर जातो. एका वर्षात जर ३०० दिवस काम केले तर २.२० कोटी पोपर कप तयार होतात. जर तुम्ही ३० पैसे प्रति दराने याची विक्री केली तर तुम्हाला अपेक्षे पेक्षाही जास्त नफा मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Business idea for new business with minimum capital 16 October 2022.

हॅशटॅग्स

Business ideas(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x