15 May 2024 12:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Call Recording | कॉलरकडून तुमचा कॉल रेकॉर्ड तर होत नाही ना?, कॉल रेकॉर्डिंग होतं असल्यास कसं कळेल पहा

Call Recording

Call Recording | भारतासह अनेक देशांमध्ये फोन कॉल रेकॉरर्डिंग करणे बेकायदेशीर आहे. मात्र तरी देखील अनेक व्यक्ती सर्रास याचा वापर करतात आणि समोरच्याची फसवणूक करतात. सध्या अनेक उच्च दर्जेचे फोन बाजारात आले आहेत. यामध्ये कॉल रेकॉरर्डिंग सुरु होताच समोरील व्यक्तीला तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे असा वॉईस मॅसेज जातो. असा मॅसेज आल्याने व्यक्ती लगेच सावध होतो. मात्र असे अनेक ऍप आहेत ज्यात सहज कुणाचाही फोन रेकॉर्ड केला जातो. तर काही फोनमध्ये ऑटो मोडवर रेकॉर्डिंग होते. त्यामुळे तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे का हे समजत नाही.

त्यामुळे अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी ही बातमी पुर्ण वाचा. यात तुम्हाला तुमचा कॉल कोण, कधी आणि कसा रेकॉर्ड करु शकतो याची माहिती दिली आहे. तसेच या पासून स्वत:चा बचाव कसा करायचा हे देखील सांगितले आहे.

कॉल रेकॉर्डिंग सुरु आहे की नाही, असे घ्या जाणून
* तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे की, नाही हे जाणून घेण्यासाठी कॉल रिसिव्ह करताना सतर्क रहा.
* तसेच फोन उचलल्यावर बिप ऐकू आल्यास समचा तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे.
* जर कॉल सुरु असताना मध्येच कोणी तो स्पीकरवर ठेवला तरी देखील तुमता कॉल रेकॉर्ड केला जाऊ शकतो.
* जेव्हा फोनवर बोलताना एखाद्या मशिनचा आवाज ऐकू आला तर समजा तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे.
* जर फोनचा वापर न करता देखील तुमचा फोन गरम होत असेल तर तो हॅक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
* कॉल रेकॉर्डिंग सुरु आहे की नाही असे तपासा
* जेव्हा तुम्ही एखादे ऍप वापरता तेव्हा फोनमध्ये वरती सारखा माईक दिसत असेल तर समजा फोन आणि वॉईस रेकॉर्ड होत आहे.
* एखादे थर्ड पार्टी ऍप तुमचा फोन रेकॉर्ड करु शकतात. त्यामुळे डाटा जास्त न वापता देखील तो कमी होत असेल तर सावध रहा.
* नोटीफीकेशन ऑफ असतानाही जर पॉपअप होत असेल तेव्हा देखील रेकॉर्डिंग सुरु असू शकते.
* विनाकारण जर तुमचा फ्रंट कॅमेरा ऑन होत असेल तेव्हा देखील रेकॉर्डिंगचा प्रयत्न सुरु असू शकतो.
* तुम्ही न करता फोनमध्ये काही बदल होत असतील जसे की, साईलेंट मोड तुम्ही न बदलता अपोआप फोन नॉर्मल मोडवर येत असेल तरी देखील सावध रहा.

असा करा स्वत:चा बचाव
* जर तुम्हाला वरील पैकी कोणत्याही कारणाने रेकॉर्डिंगचा संशय आला तर आधी सर्व थर्ड पार्टी ऍप डिलेट करा.
* फोनचा बॅकअप घेतल्यावर फॅक्ट्री डाटा रिसेट करा.
* थर्ड पार्टी ऍप वापरणे शक्यतो टाळा.
* जेव्हा एखादे ऍप इंस्टॉल कराल तेव्हा परमिशन देण्याआधी सर्व नियम वाचा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Call Recording Do this to protect yourself and your privacy 24 October 2022.

हॅशटॅग्स

Call Recording(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x