6 May 2024 9:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Multibagger Stocks | स्टॉक लहान पण कीर्ती महान, या शेअरने 2 वर्षांत 400 टक्के परतावा दिला, स्टॉकचे नाव नोट करा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | अपार इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक S&P बीएसई स्मालकॅप कंपनी असून या स्टॉकने मागील दोन वर्षात आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 20 ऑक्टोबर 2020 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत 282.75 रुपयेवरून 1494.20 रुपयेवर पोहोचली होती. दोन वर्षांच्या होल्डिंग कालावधीत स्टॉकमध्ये 428 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयेची गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.28 लाख रुपये झाले असते.

अपार इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी इलेक्ट्रिकल, मेटलर्जिकल आणि केमिकल इंजिनिअरिंग अशा विविध व्यापार करत आहे. मागील काही वर्षांमध्ये या कंपनीने पॉवर ट्रान्समिशन कंडक्टर आणि पेट्रोलियम स्पेशॅलिटी उत्पादनांच्या क्षेत्रात मूल्यवर्धित उत्पादने आणि सेवा बाजारात आणून 850 दशलक्ष डॉलर्सचा उद्योग समूह विकसित केला आहे.

या स्टॉकची मागील काही वर्षाची आर्थिक कामगिरी पाहली तर तुम्हाला समजेल की, अलीकडील तिमाहीत Q1FY23 मध्ये, एकत्रित आधारावर, कंपनीने एकूण 3083.41 कोटी रुपये निव्वळ महसूल कमावला होता, जो मागील वर्षीच्या तुलनेत 71 टक्के अधिक आहे. त्याचप्रमाणे वार्षिक नफा 96 टक्के वाढून 122.46 कोटी रुपयेवर गेला आहे.

सापेक्ष मूल्यमापन आघाडीवर, ही कंपनी सध्या 50.5x PE च्या उद्योग श्रेणीच्या तुलनेत 18.04x च्या TTM PE वर ट्रेड करत आहे. . आर्थिक वर्ष FY22 मध्ये या कंपनीचे ROE आणि ROCE अनुक्रमे 16.4 टक्के आणि 28.2 टक्के नोंदवण्यात आले होते.

मागील ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 1509.95 रुपये किमतीवर ओपन झाला होता. 1555 रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांक पातळी किंमत स्पर्श करून कंपनीने 52 आठवड्यांची उच्चांक किंमत गाठली आहे. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये एकूण 4,520 शेअर्सचे व्यवहार बाजारावर झाले आहेत. कंपनीचे शेअर्स अल्प मुदतीसाठी ASM स्टेज 1 अंतर्गत निरीक्षण करण्यासाठी ठेवण्यात आले आहेत.

मागील ट्रेडिंग सेशनमध्ये Apar Industries Ltd चे शेअर्स 1549.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ज्यात वाढ होऊन ते आता BSE निर्देशांकावर 1494.20 रुपये किमतीवर पोहोचले आहे. मागील बंदच्या तुलनेत शेअरची किमत 3.71 टक्के वाढली आहे. BSE निर्देशांकावर या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1555 रुपये आहे. तर नीचांक पातळी किंमत 558.60 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger stocks of Apar Industries Ltd share price return on investment on 25 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x