1 May 2024 6:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Post Office Scheme | बँक एफडी पेक्षा फायद्याची आहे पोस्ट ऑफिसची ही योजना, गुंतवणुकीवर अधिक पैसा देऊन जाईल

Post Office Scheme

Post Office Scheme| दीर्घकालीन गुंतवणुकीवर नेहमी चांगला परतावा मिळतो. मात्र अशी योजना आपल्याला माहीत पाहिजे ज्यात आपण पैसे गुंतवू शकतो. लोक आपले मेहनतीचे पैसे पोस्ट ऑफीसच्या योजनेत गुंतवून चांगला परतावा कमवू शकता. गुंतवणुक बाजारात अशा अनेक योजना उपलब्ध आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. अशा योजना निवडा ज्यात गुंतवणूक करून तुम्ही अल्पावधीत पैसे वाढवू शकता. अल्प गुंतवणुक करून भरघोस परतावा देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुमचे पैसे अनेक पटींनी वाढतील. आज आम्ही पोस्ट ऑफिसच्या एका जबरदस्त गुंतवणूक योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत.

पोस्ट ऑफिस बचत योजना :
इंडिया पोस्ट विभाग म्हणजेच भारतीय पोस्टल सेवा फक्त टपाल सेवा देण्याचे काम करत नाहीत तर, ते आपल्या ग्राहकांना बचत योजना देखील ऑफर करते. या योजनेत पोस्ट ऑफिसचे ग्राहक जोखीममुक्त हमी परताव्यासाठी आपले पैसे गुंतवू शकतात. या बचत योजनांमध्ये अशी एक गुंतवणुक योजना आहे, जी जबरदस्त परतावा कमावून देते.या योजनेचे नाव आहे, “ऑफिस टाइम डिपॉझिट योजना”.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना :
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये पोस्ट ऑफिस तर्फे लोकांना ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची सुविधा दिली जाते, त्यावर पोस्ट ऑफीस त्यांना व्याज परतावा देते. या गुंतवणूक योजनेत लोकांना वेगवेगळ्या कालावधीसाठी पैसे बचत करण्याची सुविधा मिळते. या योजनेत किमान 1 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्ष कालावधीसाठी पैसे गुंतवणूक करता येते. गुंतवणूकदार पोस्ट ऑफीस च्या मुदत ठेव योजनेत वेगवेगळ्या मुदतीसाठी आणि ठरलेल्या व्याजदरांसह 4 वेगवेगळे गुंतवणूक पर्याय निवडू शकतात.

गुंतवणुकीवर भरघोस परतावा :
पोस्ट ऑफिसची Time Deposit योजना एफडीचा एक प्रकार आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष किंवा पाच वर्ष कालावधीसाठी पैसे गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस आपल्या गुंतवणुकीवर एका वर्षाच्या गुंतवणुकीसाठी 5.5 टक्के व्याज परतावा देते. दोन वर्षांच्या गुंतवणुकीवर 5.7 टक्के व्याज परतावा मिळतो, 3 वर्षांच्या गुंतवणुकीवर 5.8 टक्के व्याज परतावा मिळतो, आणि पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर 6.7 टक्के व्याज परतावा मिळतो. या गुंतवणूक योजनेत पोस्ट ऑफीस आपल्या ग्राहकांना व्याज वार्षिक आधारावर देते. तथापि, व्याज परताव्याची गणना तिमाही आधारावर केली जाते. अशा परिस्थितीत तुमच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफीसच्या मुदत ठेव गुंतवणूक करू शकता, आणि भरघोस परतावाही कमवू शकता.

किमान गुंतवणूक मर्यादा :
पोस्ट ऑफिसच्या या गुंतवणूक योजनेद्वारे तुम्हाला आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत आयकर मध्ये सूट दिली जाईल. या गुंतवणूक योजनेत पैसे जमा करण्यासाठी तुम्हाला किमान 1000 रुपये जमा करावे लागतील. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही आपली गुंतवणूक काढून घेऊ शकता. या योजनेत गुंतवणुकीची कोणतीही कमाल रक्कम मर्यादा नाही. तथापि, गुंतवणूक केवळ 100 रुपयेच्या पटीत करता येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post Office Time Deposit Scheme Investment benefits on investment on 01 April 2023.

हॅशटॅग्स

Post office Scheme(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x