4 May 2024 11:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट
x

Stock To Buy | या शेअरमध्ये 25 टक्के वाढीचे संकेत, टार्गेट प्राईस 85 रुपये, स्टॉक खरेदीचा सल्ला

Stock To Buy

Stock To Buy | सरकारी मालकीची तेल शुद्धीकरण आणि त्याच्या विपणन उद्योगाशी संबंधित कंपनी आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून देऊ शकते. या कंपनीचे नाव आहे,” इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड”. स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या महारत्न कंपनीचे शेअर्स पुढील काळात 25 टक्के वर जाऊ शकतात. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मुंबई शेअर बाजारात IOCL कंपनीचे शेअर्स 68.50 रुपयांवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 94.55 रुपये आहे.

शेअर्ससाठी बाय रेटिंग टार्गेट :
डोमेस्टिक ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीज फर्मने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड/ IOCL च्या शेअर्सवर बाय रेटिंग दिली असुन स्टॉक खरेदी करण्याच्या सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअर्ससाठी ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीज फर्मने 85 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपासून 25 टक्के अधिक वाढू शकतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही एक लार्ज कॅप सरकारी कंपनी असून तिला महारत्न कंपनीचा दर्जा प्राप्त आहे. ही कंपनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 65.20 रुपये होती.

फॉर्च्यून-500 यादीत सर्वोच्च क्रमांकावर :
IOCL कंपनी फॉर्च्यून-500 यादीत समाविष्ट असलेली भारतातील सर्वोच्च क्रमांकाची ऊर्जा PSU कंपनी आहे. या कंपनीचा क्रमांक 142 वा आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 19 टक्के पेक्षा जास्त कमजोर झाले आहेत. त्याच वेळी यावर्षी आतापर्यंत या महारत्न कंपनीचे शेअर्स सुमारे 10 टक्के पडले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये मागील एका वर्षात 22 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत इंडियन ऑइल कंपनीने 2,28,359,30 कोटी रुपये महसूल कमावला होता. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत कंपनीला 272.35 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock To Buy Indian Oil Corporation limited shares are recommended by Stock market expert on 02 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x