14 May 2024 4:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Stock in Focus | बाब्बो! फक्त 17 दिवसात 200 टक्के परतावा, हा शेअर खरेदीचा विचार करा भाऊ

Stock in Focus

Stock in Focus | फँटम डिजिटल इफेक्ट्स लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये जारी करण्यात आलेल्या शेअर्सचे वाटप पूर्ण झाले आहेत. 21 ऑक्टोबर 2022 रोजी SME इंडेक्सवर सूचीबद्ध झालेल्या Phantom Digital Effects कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त 17 दिवसांत बंपर परतावा कमावून दिला आहे. या आयपीओला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. आता कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत.

21 ऑक्टोबर 2022 रोजी हा स्टॉक SME इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आला होता. IPO मध्ये शेअरची किंमत प्रति इक्विटी शेअर 91-95 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. 7 नोव्हेंबर 2022 रोजी फँटम डिजिटल इफेक्ट कंपनीचा स्टॉक 258 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. अशाप्रकारे फक्त 17 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 171 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा स्टॉक SME प्लॅटफॉर्मवर 300 रुपये किमती वर सूचीबद्ध झाला होता, आणि त्यावर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात लिस्टिंग प्रॉफिट कमावला होता.

1 लाखावर मिळाला 2.70 लाख परतावा :
SME इंडेक्सवर हा स्टॉक 300 रुपये प्रति शेअर या किमतीवर लिस्ट झाला होता. पहिल्या दिवशी दिवसा अखेर स्टॉक 312.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. लिस्टींगच्या पहिल्या दिवशी हा स्टॉक इंट्राडे सेशनमध्ये 315 रुपयांपर्यंत वाढला होता. अशा प्रकारे, या कंपनीच्या शेअरने लिस्टिंगच्या दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांहून जास्त मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही या कंपनीच्या IPO मध्ये 95 रुपये या अप्पर प्राइस बँडनुसार गुंतवणूक केली असती तर, आणि त्यात 1 लाख रुपये लावले असते, तर 17 दिवसांत तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.72 लाख रुपये झाले असते.

IPO ला मिळाला बंपर रिस्पॉन्स :
फॅंटम डिजिटल इफेक्ट्स कंपनीचा IPO मागील महिन्यात 12 ऑक्टोबर 2022 ते 14 ऑक्टोबर 2022 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. हा 29.10 कोटी रुपयांचा IPO इश्यू 164 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी जो कोटा राखीव ठेवण्यात आला होता तो 555 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 207 पट अधिक सबस्क्राईब करण्यात आला होता. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 15 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या IPO मध्ये 1200 शेअर्सची कमाल लॉट साइज निश्चित करण्यात आली होती.

कंपनीबद्दल थोडक्यात :
Phantom Digital Effects कंपनी Certified Trusted Partner Network कंपनी आहे. ही कंपनी VFX शी संबंधित सेवा सुविधा पुरवते. व्हीएफएक्सचा वापर मुख्यतः चित्रपटांमध्ये केला जातो. VFX च्या मदतीने, चित्रपटांचे दृश्य भव्य आणि वास्तविक बनवले जाते. फॅंटम डिजिटल इफेक्ट्स कंपनीचा भारतात भव्यदिव्य VFX स्टुडिओ देखील आहे. या कंपनीचे कार्यालय कॅनडा आणि अमेरिकेमध्ये ही सुरू आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock in Focus of Phantom Digital Effects Limited share price Return on investment on 09 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x