13 May 2024 9:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

PI Industries Share Price | गुंतवणूकदार शेअरवर का तुटून पडले आहेत, जाणून घ्या कारण आणि खरेदीचा विचार करा

PI Industries share price

PI Industries share price | प्रसिद्ध पेस्टिसाइड्स आणि ऍग्रोकेमिकल कंपनी पीआय इंडस्ट्रीजचे शेअर्स गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली आहे. या कंपनीच्या शेअर्सनी इंट्राडे सेशनमध्ये 11 टक्क्यांची उसळी घेऊन आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्यामागचे कारण म्हंन कंपनीने उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केले आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञ आता हा स्टॉक वर उत्साही आहेत.

पीआय इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3297.15 रुपये किमतीवर बंद झाले होते. आज इंट्राडे सेशनमध्ये स्टॉक 11.40 टक्क्यांच्या वाढीसह 3,698 रुपयांवर ट्रेड करत होता. 1 सप्टेंबर 2022 रोजी या स्टॉकने आपला 3,505 रुपयांचा सर्वकालीन विक्रमी उच्चांक स्पर्श केला होता. पीआय इंडस्ट्रीज कंपनी ही कीटकनाशके आणि कृषी रसायने उत्पादन करणारी आघाडीची कंपनी आहे. या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 55 लाख कोटी रुपये आहे.

उत्कृष्ट तिमाही निकाल :
PI Industries कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीचे उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहेत. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत PI इंडस्ट्रीज कंपनीने 17,700 कोटी रुपयांचा महसुल कमावला असून महसुलात वार्षिक 31 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या निर्यातीतही कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचा PAT वार्षिक आधारावर 46 टक्क्यांच्या वाढीसह 334.80 कोटी रुपये झाला आहे.

शेअरची वाटचाल :
PI इंडस्ट्रीज कंपनीचा शेअर मागील एका वर्षात कमालीचा वाढला आहे. सध्या या शेअरची किंमत 11.14 टक्क्यांच्या वाढीसह 3,664.45 रुपयांवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या शेअरची किंमत जवळपास 23 टक्क्यांनी वधारली आहे. त्याच वेळी, मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी 43 टक्के परतावा कमावला आहे. 2022 या चालू वर्षांत या स्टॉकमध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. एका वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 31 टक्के परतावा कमावून दिला आहे.

ब्रोकरेज फर्मचा सल्ला :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीज फर्मचा विश्वास आहे की, सध्याच्या CSM उत्पादनांच्या वाढीसह बिगर-कृषी रासायनिक क्षेत्रातूनही CSM निर्यातीची मागणी वाढताना दिसत आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या सहामाहीत नवीन प्रोडक्ट लॉन्च केल्याचा मजबूत फायदा कंपनीला मिळत आहे. ब्रोकरेज फर्मचा असा विश्वास आहे की उत्तम व्यवस्थापनामुळे कंपनीच्या महसुलात 20 टक्के वाढ तर झालीच सोबत कंपनीच्या मार्जिनमध्येही कमालीची सुधारणा दिसून आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PI Industries share price return on investment on 10 November 2022.

हॅशटॅग्स

PI Industries share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x