22 May 2024 2:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

Unknown Caller | ट्रू कॉलर अ‍ॅप इतिहासजमा होण्याच्या दिशेने, सरकार KYC प्रमाणे कॉलरची माहिती दाखवणार

Unknown caller

Unknown Caller | आज जगभरात अनेक जण ट्रू कॉलर अ‍ॅपचा वापर करतात. या अ‍ॅपमध्ये अनेक खास फिचर्स आहेत, ज्याच्या मदतीने कोणती व्यक्ती अज्ञात नंबरवरून युजरला कॉल करत आहे. अनेक वेळा लोक प्रश्न करतात की ट्रू कॉलर अ‍ॅप अज्ञात व्यक्तीचे नाव कसे शोधते? अनोळखी कॉलरचं नाव सांगण्यासोबतच हे अ‍ॅप तुम्हाला इतरही अनेक फिचर्स देतं. ट्रू कॉलर अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही कॉलर आयडेंटिफिकेशन, कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल ब्लॉकिंगही करू शकता. याच कारणामुळे अनेकजण या अ‍ॅपचा वापर करतात. मात्र आता ट्रू कॉलर अ‍ॅप इतिहास जमा होण्याची शक्यता आहे.

कारण स्वतः भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) लवकरच अशा उपाययोजना सुरू करणार आहे, ज्यामुळे कॉल/रिंगिंग होत असताना रिसीव्हरच्या फोन स्क्रीनवर कॉलरचे नाव चमकेल, असे एका अहवालात म्हटले आहे. कॉलरने सादर केलेल्या नो युवर कस्टमर (केवायसी) डेटाच्या आधारे हे नाव जोडले जाईल, असे पीटीआयच्या अहवालात म्हटले आहे.

या योजनेअंतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीला नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल तर त्यासाठी भरण्यात येणारा केवायसी (KYC) फॉर्मवर त्याला स्वत:ची सर्व खरी माहिती भरावी लागेल. शिवाय त्या फॉर्मवर सिम कार्ड वापरकर्त्याचे जे नाव असेल तेच नाव त्या व्यक्तीने इतरांना कॉल केल्यावर दिसणार आहे. ट्रायच्या या उपक्रमामुळे अनेक जणांची अनोळखी नंबरमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे.

KYC प्रमाणे खरी माहीती मिळणार
अनोळखी नंबरवरुन आलेल्या कॉलमुळे अनेक लोकांची आर्थिक फसवणूक झाल्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत. त्यामुळे आता अनोळखी नंबरवरुन लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर काही प्रमाणाक आळा बसणार आहे. दरम्यान, सध्या देखील आपल्याला अनोळखी नंबर कोणाचा आहे हे पाहता येतं. त्यासाठी आपण Truecaller सारख्या अ‍ॅप्सचा वापर देखील करतो. मात्र Truecaller सारखी अ‍ॅप्स तुमच्या मोबाईलमधील डाटा विकण्याची शक्यता असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Unknown caller details will be displayed as per KYC provided says TRAI report check details on 16 November 2022.

हॅशटॅग्स

#Unknown caller(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x