2 May 2024 3:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Naysaa Securities Share Price | या शेअरवर 579% परतावा प्लस बोनस शेअर्स जाहीर होताच खरेदीसाठी झुंबड, ट्रेडिंग बंद करण्यात आली

Multibagger Stock

Naysaa Securities Share Price | स्मॉल कॅप कंपनी न्यासा सिक्युरिटीज लिमिटेडने आपल्या विद्यमान शेअर धारकांना एक मोठी भेट देण्याचे जाहीर केले आहे. ही कंपनी लवकरच आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 10 शेअर्सवर 15 बोनस शेअर्स मोफत वाटप करणार आहे. सध्या या स्टॉकची ट्रेडिंग बंद करण्यात आली असून कंपनीचे शेअर्स शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 176.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 नोव्हेंबर 2022 पासून बीएसई इंडेक्सवर या कंपनीची ट्रेडिंग बंद करण्यात आली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 76.66 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः आपल्या ग्राहक कॉरपोरेट कंपन्यांना आर्थिक सल्ला देण्याचे काम करते. 23 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीत विद्यमान शेअर धारकांना 15:10 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

दर वार्षिक आधारावर 579 टक्के परतावा : Naysaa Securities Share Price
सध्या Nyasa Securities Ltd कंपनीचे शेअर 176.45 रुपये किमतीत ट्रेड करत आहेत. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 160.45 रुपये किमतीवर बंद झाला होता, त्या तुलनेत स्टॉक 9.97 टक्के वाढीसह ट्रेड करत आहे. 26 सप्टेंबर 2014 रोजी या कंपनीचा शेअर 14.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक 176.45 रुपयेपर्यंत वाढला आहे. मागील पाच वर्षांत 24 नोव्हेंबर 2017 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत 36.64 रुपयेवरून सध्याच्या बाजार भावावर पोहचली आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 381.58 टक्के परतावा कमावून दिला आहे. 24 नोव्हेंबर 2021 रोजी हा शेअर 26.95 रुपयेवर ट्रेड करत होता. म्हणजेच या शेअरने अवघ्या एका वर्षात लोकांना 554.73 टक्के बंपर परतावा मिळवून दिला आहे. हा स्टॉक 6 जानेवारी 2022 रोजी 25.99 रुपयेवर ट्रेड करत होता. YTD आधारे या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 578.91 टक्केचा मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.

15:10 च्या प्रमाणात बोनस शेअर :
कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, 23 नोव्हेंबर 2022 रोजी न्यासा सिक्युरिटीज कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती, आणि या बैठकीत विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या बैठकीत बोनस शेअर्स वाटप करण्याचे प्रमाण 15:10 या प्रमाणे मंजूर करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात Q2 तिमाहीमध्ये जाहीर आकडेवारीनुसार या कंपनीत 46.92 टक्के भागीदारी प्रवर्तक होल्ड करत आहेत. आणि 53.09 टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांकदे होल्ड आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Naysaa Securities share price Return on investment on 26 November 2022

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x