2 May 2024 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Sarkari Shares | फायदा कुठे? सरकारी बँक FD की सरकारी बँकेचे शेअर्स? पैसा दुप्पट कुठे होतोय पहा, लिस्ट सेव्ह करा

Sarkari shares

Sarkari Shares | जगात आर्थिक मंदी येण्याचे संकेत मिळत आहे. अनेक देशांची परिस्थिती बिकट झाली आहे. एकीकडे विकसित अर्थव्यवस्था असलेल्या देशांचे शेअर्स बाजार गडगडत आहेत, तर दुसरीकडे भारतीय शेअर बाजार तेजीत सुसाट धा आहे. भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी-50 आपल्या सर्वकालीन उच्चांक स्तरावर ट्रेड करत आहेत. काही सेक्टर मध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी होताना दिसत नाही आहे. मात्र सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स कमालीचे वाढले आहेत. काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे.

बँक ऑफ बडोदा :
बँक ऑफ बडोदा या PSU बँकेने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत उत्कृष्ट कमाई करून दिली आहे. एक वर्षापूर्वी या बँकेचे शेअर्स 77 रुपयांवर ट्रेड करत होते, मात्र आता हा या शेअरची किंमत 187.40 रुपयांवर पोहचली आहे. या बँकेचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, बँक ऑफ बडोदाच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या एका वर्षात 145 टक्के परतावा कमावून दिला आहे.

पंजाब आणि सिंध बँक :
पंजाब आणि सिंध बँकेच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मालामाल केले आहे. 1 वर्षापूर्वी पंजाब आणि सिंध बँकेचे शेअर्स 13 रुपयावर ट्रेड करत होते, मात्र आता या बँकेचा शेअर 31.65 रुपयांवर पोहचला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेच्या शेअरने एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 143 टक्के परतावा कमावून दिला आहे.

कॅनरा बँक:
कॅनरा बँकेच्या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना 90 टक्के परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी बँकेच्या शेअरचा भाव १७१ रुपयांच्या पातळीवर होता. आज कॅनरा बँकेचा शेअर आता 324.50 रुपयांवर बंद झाला.

पंजाब नॅशनल बँक :
पीएनबी बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्सनेही आपल्या शेअर धारकांना 100 टक्क्यांहून अधिक कमाई करून दिली आहे. एक वर्षभरापूर्वी पंजाब नॅशनल बँकेचे शेअर 28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या पीएनबीचे शेअर्स 57.90 रुपयांवर ट्रेड करत आहेत. पंजाब नॅशनल बँकेचे चार्ट पॅटर्न पाहिल्यास तुम्हाला समजेल की, या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 104 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया :
या बँकेच्या शेअर्समध्येही एका वर्षभरात 88 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. एका वर्षभरापूर्वी या बँकेच्या शेअर्स 16.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन आता स्टॉक 30.60 रुपये किमतीवर पोहचला आहे.

बँकिंग क्षेत्रात तेजी येण्याचे कारण :
या सर्व सरकारी बँकावर एनपीए वाढीचे जबरदस्त दबाव होते. मागील काही वर्षात या बँकांना मोठे नुकसानही सहन करावे लागले होते. आता बँकांनी आपले ताळेबंद साफ केले आहे. बँकांच्या या निर्णयानंतर गुंतवणूकदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून PSU बँकिंग स्टॉकमध्ये पैसे लावण्यास सुरुवात केली आणि याच कारणामुळे PSU बँकिंग शेअर्स तेजीत वाढत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Sarkari Shares of PSU Bank which has given Double Return in short term up to 09 December 2022.

हॅशटॅग्स

#Sarkari Shares(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x