29 April 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा
x

TTML Share Price | टाटा के साथ नो घाटा, टाटा ग्रुपचा हा शेअर 70% स्वस्त झालाय, आज 5% कोसळला, तज्ज्ञांचं स्टॉकबद्दल मत काय?

TTML Share price

TTML Share Price | आज TTML कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांची कमजोरीसह 82.95 रुपये किमतीवर ओपनिंग केली आहे. आज TTML कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या स्टॉकमध्ये आज प्रचंड मोठा विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. इंट्राडे ट्रेडमध्ये TTML स्टॉक 5 टक्के लोअर सर्किटवर ट्रेड करत आहे. या स्टॉकच्या घसरणी मुले गुंतवणूकदारांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)

उच्चांकावरून 70 टक्के पडला :
एकेकाळी बक्कळ पैसा कमावून देणारा हा TTML कंपनीचा स्टॉक सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमती वरून 70 टक्के कमजोर झाला आहे. टाटा समूहाचा भाग असलेल्या या कंपनीच्या शेअरची किंमत 11 जानेवारी 2022 रोजी 291.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचली होती. अशा परिस्थितीत सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 70 टक्के खाली पडला आहे.

शेअर किमतीचा इतिहास :
BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार TTML कंपनीच्या शेअर्समध्ये 2022 या वर्षात कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे. हा स्टॉक या वर्षात जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली आहे. चालू आर्थिक वर्षात TTML कंपनीचा स्टॉक जवळपास 60 टक्के खाली आला आहे. 216 रुपयांवर ट्रेड करणारा स्टॉक सध्या 82 रुपयांवर घसरला आहे. TTML ही एक लार्ज कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 17 हजार कोटी रुपये आहे. जर तुम्ही 2022 या वर्षाच्या जानेवारीमध्ये TTML कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य फक्त 40 हजार राहिले असते. तुमचे या स्टॉकमध्ये 60 टक्के नुकसान झाले असते.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
Tata Teleservices या कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणारी TTML ही कंपनी आपल्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना मुख्यतः व्हॉईस आणि डेटा सेवा प्रदान करते. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठ्या दिग्गज कंपनीचा समावेश होतो. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते मागील महिन्यात या कंपनीने आपल्या ग्राहक कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा लाँच केली होती. आपल्या ग्राहक कंपन्यांना क्लाउड आधारित सुरक्षा सेवा आणि वेगवान इंटरनेट सुविधा, ऑप्टिमाइझ्ड कंट्रोल सेवा उपलब्ध केल्याने याला ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

तज्ज्ञ काय सांगतात
5G तंत्रज्ञान पूर्णपणे अंमलात आल्यावर टीटीएमएल पुन्हा उभारी घेईल असं तज्ज्ञ सांगत आहेत. तसेच या कंपनीसोबत टाटांचं नाव असल्याने गुंतवणूक आणण कठीण नसल्याचं देखील तज्ज्ञ सांगत आहेत. परिणामी गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित होतं आहेत.

TTML Share Price

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| TTML Share price has fallen down and touched low price on 23 December 2022.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x