10 May 2024 11:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Multibagger Mutual Fund | पैसे कमवायचे आहेत? टॉप 5 लार्ज कॅप म्युचुअल फंड योजनांची लिस्ट सेव्ह करा, नफ्यात राहा

Multibagger Mutual Fund

Multibagger Mutual Fund | इक्विटी म्युच्युअल फंड दीर्घ काळात मजबूत परतावा कमावून देतात. लार्ज-कॅप म्युचुअल फंड हाऊस नेहमी “ब्लू चिप” म्हणजेच “लार्ज कॅप” कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावतात. लार्ज कॅप म्युचुअल फंड हे स्मॉल आणि मिड कॅप म्युच्युअल फंड योजनापेक्षा सुरक्षित मानले जातात. गुंतवणूक तज्ञ नेहमी लोकांना सल्ला देतात की म्युचुअल फंडात गुंतवणूक करताना नेहमी त्याच्या ऐतिहासिक परताव्याच्या आधारावर निर्णय घेऊ नये, कारण म्युचुअल फंड भविष्यात शाश्वत पर्यावा देतील याची गॅरंटी नसते. म्हणून आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 लार्ज कॅप म्युचुअल फंडांची माहिती देणार आहोत, जे तुम्हाला 2023 मध्ये मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. हे म्युचुअल फंड मागील 3 वर्षांच्या सरासरी परताव्याच्या आधारावर आणि अप कॅप्चर/डाउन कॅप्चर गुणोत्तरप्रमाणच्या आधारे निवडले गेले आहेत. 100 पेक्षा अधिक अपसाइड कॅप्चर गुणोत्तर हे सूचित करते की या म्युचुअल फंडाने आपल्या बेंचमार्क निर्देशांकापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. तर 100 पेक्षा कमी डाउनसाइड कॅप्चर गुणोत्तर सूचित करते की या म्युचुअल फंडाने त्याच्या बेंचमार्कच्या तुलनेत अधिक तोटा केला आहे.

मिरे अॅसेट लार्ज कॅप फंड :
या म्युचुअल फंडने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्शिक 3 वर्षात 15.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात निफ्टी-100 इंडेक्समध्ये 96.69 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या म्युचुअल फंडाचा मागील 10 वर्षातील अप मार्केट कॅप्चर रेशो 102 टक्के आणि डाउन मार्केट कॅप्चर रेशो 91 टक्के नोंदवला गेला होता.

कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड :
या म्युचुअल फंडाने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 3 वर्षांत 13.38 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात निफ्टी-100 लार्ज कॅप इंडेक्समध्ये 92.45 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. या म्युचुअल फंडाचा मागील 10 वर्षात अप मार्केट कॅप्चर रेशियो 94 टक्के होता, ते आणि डाउन मार्केट कॅप्चर रेशो 78 टक्के नोंदवला गेला होता.

अॅक्सिस ब्लूचिप फंड :
या म्युचुअल फंडाने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी दराने 3 वर्षांत 13.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात निफ्टी-100 लार्ज कॅप इंडेक्स मध्ये 89.98 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या म्युचुअल फंडाचा मागील 10 वर्षात अप मार्केट कॅप्चर रेशियो 93 टक्के होता, तर डाउन मार्केट कॅप्चर रेशो 73 टक्के नोंदवला गेला होता.

ICICI प्रुडेन्शियल ब्लूचिप फंड :
ICICI प्रुडेन्शियल ब्लूचिप म्युचुअल फंडाने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 13.11 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात NIFTY-100 लार्ज कॅप इंडेक्समध्ये 84.96 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या म्युचुअल फंडाचा मागील 10 वर्षात अप मार्केट कॅप्चर रेशियो 96 टक्के नोंदवला गेला होता, तर डाउन मार्केट कॅप्चर रेशो 89 टक्के होता.

कोटक ब्लूचिप फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 12.13 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात निफ्टी 100 लार्ज कॅप इंडेक्समध्ये 74.70 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. या म्युचुअल फंडाचा मागील 10 वर्षांमध्ये अप मार्केट कॅप्चर गुणोत्तर 99 टक्के नोंदवला गेला होता. तर डाउन मार्केट कॅप्चर गुणोत्तर प्रमाण 98 टक्के नोंदवला गेला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Top Mutual Fund schemes for investment in 2023 check details on 23 December 2022.

हॅशटॅग्स

Multibagger Mutual Fund(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x