29 April 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

Money Making Shares | मस्तच! 529% परतावा प्लस 1 शेअरवर 6 फ्री बोनस शेअर्स, या स्टॉकचे गुंतवणूकदार मालामाल, डिटेल्स पहा

Money Making Shares

Money Making Shares | GM Polyplast Ltd या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 6 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. बोनस शेअर्स वाटपाची घोषणा केल्यानंतर काल या कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्के लोअर सर्किटवर ट्रेड करत होती. काल या कंपनीचे शेअर्स 1,058.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

कंपनीने बोनस शेअर्स ची घोषणा केली :
GM Polyplast Ltd या स्मॉल कॅप कंपनीने 6 : 1 या प्रमाणत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आणि त्याची रेकॉर्ड डेटही कंपनीच्या संचालक मंडळाने जाहीर केली आहे. या कंपनीने आपल्या स्टॉक एक्स्चेंज नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की,” सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स 2015 च्या नियमन 42 नुसार GM Polyplast Ltd कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 6 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक शेअरवर 6 बोनस शेअर्स मोफत देणार आहे”. कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख बुधवार दिनांक 04 जानेवारी 2022 असेल अशी माहिती दिली आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
जीएम पॉलीप्लास्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स काल बीएसई इंडेक्सवर 5 टक्के लोअर सर्किटवर 1058.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची लिस्टिंग 14/10/2020 रोजी BSE इंडेक्सवर करण्यात आली होती. सूचीबद्ध झाल्यापासून आतपर्यंत या शेअरची किंमत 491.97 टक्के वाढली आहे. 1 वर्षापूर्वी 24 डिसेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 168 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 529.85 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या स्टॉकने मागील सहा महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 344.41 टक्के आणि मागील 1 महिन्यात 4.94 टक्के परतावा कमावून दिला आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
जीएम पॉलीप्लास्ट लिमिटेड ही औद्योगिक क्षेत्रात व्यापार करणारी कंपनी आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 203.46 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः एचआयपीएस, एबीएस, पीईटी, पीपी, एचडीपीई शीट्स आणि ग्रॅन्युलच्या टॉप उत्पादकांपैकी एक मानली जाते. जीएम पॉलीप्लास्ट लिमिटेड कंपनीने 2003 मध्ये आपले काम सुरू केले होते. GM Polyplast Limited कंपनीचे मुख्य उत्पादन केंद्र सिल्वासा आणि मुंबई येथे स्थित आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money Making Shares of GM Polyplast Share Price in focus after Free Bonus Shares check details on 24 December 2022.

हॅशटॅग्स

Money Making Shares(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x