6 May 2024 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

Power Finance Corporation Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, स्टॉक उच्चांकावर, 5 दिवसात 15% परतावा, खरेदी करणार?

Power Finance Corporation Share Price

Power Finance Corporation Share Price | पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीच्या शेअर्सनी आपली विक्रमी उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर PFC या महारत्न कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 157.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के वाढीसह 154.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 5 मे 2017 रोजी PFC कंपनीचे शेअर्स 162 रुपये किमतीवर व्यापार करत होते. पीएफसी शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 97.15 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Power Finance Corporation Share Price | Power Finance Corporation Stock Price | PFC Share Price | PFC Stock Price | BSE 532810 | NSE PFC)

6 महिन्यांत 45 टक्क्यांची वाढ :
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 45 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. बीएसई इंडेक्सवर 4 जुलै 2022 रोजी या महारत्न कंपनीचे शेअर्स 107.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 156.05 रुपयांवर क्लोज झाले होते. मागील 5 दिवसात पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये 15 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 27 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 41,199 कोटी रुपये आहे .

तिमाही नफा :
चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीने 2,998.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी मुख्यतः वीज क्षेत्रात वित्तपुरवठा आणि विकास संबंधित गरजांची पूर्तता करण्यासाठी पॉवर युटिलिटीजना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचे काम करते. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत PFC दर्जा असलेल्या या महारत्न कंपनीने 10,078.11 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीने त्यावेळी 2,998.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत PFC या सरकारी कंपनीने 9033.52 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, आणि त्यावेळी कंपनीने 2109.52 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Power Finance Corporation Share Price 532810 PFC check details on 04 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x