15 May 2024 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Bharat Electronics Share Price | सरकारी शेअर! 1 लाख गुंतवणूकीवर 45 कोटी परतावा दिला, किंमत फक्त 2 आकडी, खरेदी करणार?

Bharat Electronics Share Price

Bharat Electronics Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवण्यासाठी एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती म्हणजे ‘संयम’. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार दीर्घ मुदतीसाठी मजबूत फंडामेंटल्स असलेल्या शेअर्समध्ये पैसे लावतात, म्हणून ते मजबूत परतावा कमावतात. अशीच एक मजबूत फंडामेंटल्स असलेली आणि नवरत्न दर्जा प्राप्त कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या बाबतीत घडले आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणाऱ्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या नशिबाने कलाटणी घेतली आहे. मागील 23 वर्षांत या सरकारी मालकीच्या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 45,627 टक्के परतावा कमावून दिला आहे. 23 वर्षापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये लावणार व्यक्ती आज करोडो रुपयांचा मालक बनला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bharat Electronics Share Price | Bharat Electronics Stock Price | BEL Share Price | Stock Price | BSE 500049 | NSE BEL)

मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी BEL कंपनीचे शेअर्स 0.35 टक्क्यांच्या वाढीसह 100.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी BEL कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के घसरणीसह 98.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या सरकारी मालकीच्या कंपनीने आपल्या आयुष्यात आतापर्यंत 3 वेळा बोनस शेअर्सही वाटप केले आहेत. मागील 6 महिन्यांत बीईएल कंपनीच्या स्टॉकमध्ये 39 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. त्याच वेळी हा स्टॉक मागील एका वर्षात 43 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

1 लाखाचे 45 कोटी झाले, कसे? जाणून घ्या :
जर तुम्ही 1999 साली BEL कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते, तर तुम्हाला त्यावेळी 4,54,545 शेअर्स मिळाले असते. जर तुम्ही हे शेअर्स आत्तापर्यंत होल्ड करून ठेवले असते तर आज तुमच्या शेअर्सची संख्या 44,99,994 झाली असती. कारण मागील 23 वर्षांच्या आयुष्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना 3 वेळा मोफत बोनस शेअर वाटप केले होते. 14 सप्टेंबर 2015 रोजी प्रथमच BEL कंपनीने 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स जारी केले होते. 28 सप्टेंबर 2017 रोजी BEL या सरकारी कंपनीने पुन्हा 1:10 या प्रमाणात बोनस शेअर जारी केले होते. तिसऱ्या वेळी BEL कंपनीने 2:1 च्या प्रमाणात बोनस वाटप केले होते. जर आपण सध्याच्या 100.70 रुपये प्रति शेअर ट्रेडिंग किंमतीनुसार परतावा मोजला तर आपल्याला समजेल की BEL कंपनीने 1 लाख रुपये गुंतवणूकीवर 45 कोटी रुपये परतावा दिला आहे.

शेअरमध्ये वाढ होण्याची शक्यता :
आशिका स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, “बीईएल या सरकारी मालकीच्या नवरत्न दर्जा प्राप्त कंपनीची बाजारातील हिस्सेदारी 50 टक्के पेक्षा अधिक आहे. BEL कंपनी भारतीय सेनेच्या संरक्षण संबंधित इलेक्ट्रॉनिक्स गरजा पूर्ण करण्याचे काम करते. BEL कंपनी मुख्यतः लष्कर, हवाई दल आणि नौदलाची इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मुख्य पुरवठादार मानली जाते. भारत सरकारने संरक्षण क्षेत्रातील आयात कमी करून स्वदेशीचा पुरस्कार करण्यावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे पुढील काळात BEL कंपनीला अधिक फायदा होणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bharat Electronics Share Price 500049 BEL in focus check details on 04 January 2023.

हॅशटॅग्स

Sarkari Share(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x