29 April 2024 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?
x

Droneacharya Aerial Innovations Share Price | हा शेअर पैशाचा छापखाना! 6-7 दिवसात 200% परतावा, आता रोज 5-10% परतावा

Droneacharya Aerial Innovations Share Price

Droneacharya Aerial Innovations Share Price | ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स या कंपनीने शेअर बाजारात धमाकेदार एंट्री मारली आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाले. कंपनीने IPO मध्ये शेअरची किंमत 52-54 रुपये दरम्यान निश्चित केली होती. या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना 54 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई इंडेक्सवर 90 टक्के प्रीमियमसह 102 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. शेअर्स लिस्टिंगच्या दिवशी 107.10 रुपये पर्यंत वाढले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)

ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स लिस्टिंगपासून रोज अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. 4 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स रोज 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 165.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीच्या शेअर्सनी IPO मध्ये पैसे लावलेल्या लोकांना 200 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचा IPO 2022 मधील सर्वात जास्त वाढलेला मल्टीबॅगर IPO आहे. मागील 8 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स सतत 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत.

ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीने एक लॉटमध्ये कमाल 2000 शेअर्स जारी केले होते. म्हणजेच गुंतवणूकदारांना 1 लॉट खरेदी करण्यासाठी 1.08 लाख रुपये गुंतवणूक करावे लागले होते. 4 जानेवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स 158.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओ शेअर्स अलॉट करण्यात आले होते, त्यांच्या 1.08 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3.16 लाख रुपये झाले.

ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचा IPO येण्या आधी शंकर शर्मा यांनी कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. 13 डिसेंबर 2022 रोजी ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीने 34 कोटी रुपयांचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला होता. 15 डिसेंबर 2023 रोजी हा IPO क्लोज झाला होता. ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीच्या आयपीओला अप्रतिम प्रतिसाद मिळाला होता. कंपनीने IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवलेला कोटा 330.82 पट अधिक सबस्क्राइब झाला झाला होता. तर या IPO मध्ये गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 287.40 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. कंपनीचा संपूर्ण IPO 243.70 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Droneacharya Aerial Innovations Share Price 543713 in focus check details on 05 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x