7 May 2024 2:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

HDFC Mutual Fund | हमखास जबरदस्त परतावा मिळेल, 5 वर्षांत 10000 SIP तून 9 लाख परतावा, योजनेचा तपशील वाचा

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्स फंड इक्विटी डायरेक्ट प्लॅन अंतर्गत मागील तीन वर्षांत लोकांनी 25.45 टक्के परतावा कमावला आहे. AMFI वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार ही म्युचुअल फंड योजना मागील 3 ते 5 वर्षांतील परताव्याच्या बाबतीत आपल्या श्रेणीत कामगिरी करणारी सर्वोत्तम योजना आहे. म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार जर तुम्ही एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्स फंड इक्विटी प्लॅनमध्ये 10,000 रुपये मासिक एसआयपी गुंतवणूक केली असती तर, 3 वर्षांत तुमची गुंतवणूक रक्कम 5.4 लाख रुपये झाली असती. त्याच वेळी या म्युचुअल योजनेत 15,000 रुपयांची एसआयपी गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संपत्ती तीन वर्षांत 8.15 लाख रुपये वाढली आहे. 5000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी मागील तीन वर्षांत 2.71 लाख रुपये परतावा कमवला आहे. (HDFC Mutual Fund Scheme, HDFC Mutual Fund SIP – Direct Plan | HDFC Fund latest NAV today | HDFC Mutual Fund latest NAV and ratings)

या म्युचुअल फंड योजनेत लॉक-इन कालावधी देण्यात आला आहे. गुंतवणूकदार पाच वर्षे किंवा निवृत्तीचे वय, यापैकी जे आधी असेल तोपर्यंत योजनेतील पैसे काढून घेऊ शकत नाही. डायरेक्ट प्लॅन अंतर्गत या म्युचुअल फंडाने मागील 5 वर्षांत 15.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने लोकांना 14.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या योजनेत 10,000 रुपये मासिक एसआयपी गुंतवणूक केली होती, त्यांनी 15.5 टक्के दराने 5 वर्षांत 9 लाख रुपये परतावा मिळवला आहे. या म्युचुअल फंडाच्या थेट प्लॅनमध्ये दरमहा 15,000 रुपये SIP गुंतवणुकीवर 5 वर्षात 13.6 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे. नियमित योजनेअंतर्गत या म्युचुअल फंड योजनेने लोकांना तीन वर्षांत 23.90 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात थेट योजने अंतर्गत लोकांना 9.27 टक्के ​​आणि नियमित योजनेअंतर्गत 7.89 टक्के परतावा मिळाला आहे.

योजनेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी : 

1) HDFC सेवानिवृत्ती बचत निधी – इक्विटी योजना “खूप उच्च” जोखीमीची योजना मानली जाते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी यात पैसे लावताना तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. यात पैसे लावण्यापेक्षा कमी जोखीम असलेल्या इतर योजनांची निवड करावी.

2) एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्स फंड इक्विटी प्लॅन या योजनेत लॉक-इन कालावधी 5 वर्षे किंवा निवृत्तीच्या वयापर्यंत जे आधी असेल तो ठरवण्यात आला आहे. ही एक मुक्त सेवानिवृत्ती गुंतवणूक सेवा देणारी म्युचुअल फंड योजना आहे.

3) या म्युचुअल फंडाच्या अधिकृत वेबसाइटनुसार HDFC रिटायरमेंट सेव्हिंग्ज फंड इक्विटी प्लॅन योजना कर बचत कम पेन्शन योजना देखील आहे. या म्युचुअल फंड योजनेतील पोर्टफोलिओपैकी किमान 80 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये आहे, तर इतर गुंतवणूक इक्विटी संबंधित साधनांमध्ये लावली आहे.

4) 7 सप्टेंबर 2021 रोजी एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्स फंड इक्विटी प्लॅन ग्रोथ ऑप्शनचे एनएव्ही मूल्य 33.440 रुपये होते. तर 7 सप्टेंबर 2022 रोजी एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्ज फंड इक्विटी प्लॅन रेग्युलर प्लॅऑप्शनचे एनएव्ही मूल्य 30.4910 रुपये होते.

5) HDFC सेवानिवृत्ती बचत निधी इक्विटी योजना 25 फेब्रुवारी 2016 रोजी गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली होती. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत या म्युचुअल फंडाची AUM 2414.12 कोटी रुपये नोंदवण्यात आली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HDFC Mutual Fund scheme long term benefits on 13 February 2023.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x