3 May 2024 8:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

TTML Share Price | टीटीएमएल शेअर धडाम! स्टॉकमध्ये मंदी वाढली? पुढे स्टॉकबद्दल तज्ज्ञ काय सांगतात?

TTML Share Price

TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी 6.58 टक्के घसरणीसह 59.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील वर्षी जानेवारी 2021 पर्यंत या कंपनीचे शेअर आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून देत होते. मात्र एक वर्षभरापासून हा स्टॉक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. टीटीएमएल कंपनीच्या शेअरने 2022 या वर्षात आपल्या शेअर धारकांना निराश केले आहे. ज्या लोकांनी वर्षभरापूर्वज या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 47000 वर आले आहेत. या टीटीएमएल स्टॉक 54 टक्के कमजोर झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)

11 जानेवारी 2021 रोजी टीटीएमएल कंपनीच्या शेअरने 290.15 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. यानंतर स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि घसरणीची प्रक्रिया सुरू झाली. मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी 6.58 टक्के घसरणीसह 59.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. यातून गुंतवणूकदारांचा झालेल्या नुकसानीचा अंदाज तुम्ही लावू शकता. मागील सहा महिन्यांत हा स्टॉक 36 टक्क्यांहून अधिक कमजोर झाला आहे तर मागील एका महिन्यात शेअरची किंमत 25 टक्क्यांनी पडली आहे. टीटीएमएल शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 63.55 रुपये होती.

कंपनीची आर्थिक कामगिरी :
टीटीएमएल कंपनीवर सध्या 18,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. मागील 10 वर्षात या कंपनीला एकदाही नफा झालेला नाही, आणि कंपनीचे उत्पन्न देखील वाढत नाही. टीटीएमएल कंपनीने 10 वर्षांपूर्वी जितकी कमाई केली होती, त्यापेक्षा कमी कमाई मागील 11 तिमाहींमध्ये केली आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीला 1,534 कोटी रुपये व्याज म्हणून भरावे लागले, तर कंपनीचे उत्पन्न 1,105 कोटी रुपये होते.

टीटीएमएल कंपनीबद्दल थोडक्यात :
टीटीएमएल कंपनी ही Tata Teleservices ची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी आपल्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर म्हणून काम करते. कंपनी आपल्या ग्राहकांना व्हॉईस, डेटा सेवा, प्रदान करते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठ्या कंपन्याचे नाव सामील आहे. क्लाउड आधारित सुरक्षा सेवा हे या कंपनीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. टीटीएमएल कंपनी भाडेतत्त्वावर डिजिटल आधारावर चालत असलेल्या व्यवसायांना आणि ग्राहक कमनीनाना मोठ्या प्रमाणात आपल्या सेवा प्रदान करते. यामध्ये सर्व प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी अंगभूत सुरक्षा व्यवस्था तसेच वेगवान इंटरनेट सुविधाही प्रदान करण्यात येते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price 532371 stock market live on 21 February 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x