13 May 2024 8:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Gold Price Today | लग्नसराईच्या हंगामात खुशखबर! आज सोन्याचे दर पुन्हा धडाम, पटापट आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. या हंगामात सोन्या-चांदीची मागणी वाढते. जर तुम्हालाही लग्नसराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर ही चांगली संधी असू शकते. सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोन्याच्या दराने 5 आठवड्यांचा निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

जर तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यावेळी तुम्हाला स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी आहे. सध्या सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 56 हजारांच्या जवळपास आहे. तर चांदीचा भाव 65,800 च्या जवळपास आहे. जर तुम्हीही सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर पाहा आज काय आहे 10 ग्रॅमची किंमत

सोन्याचे दर 2700 रुपयांनी स्वस्त झालंय
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.09 टक्क्यांनी घसरून 56120 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सध्या वायदा बाजारात सोने विक्रमी उच्चांकी पातळीवरून २,७०० रुपयांनी स्वस्त झाले असून ते या पातळीवर कायम आहे. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 56,471 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

चांदी देखील स्वस्त झाली
याशिवाय चांदी 0.28 टक्क्यांनी म्हणजेच 230 रुपयांनी घसरून 65866 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

आपल्या शहरासाठी दर तपासा
तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल देऊनच किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचे मेसेज येतील.

काय आहे कारण :
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेड रिझर्व्ह पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारात गुंतवणूकदार सावध आहेत. याशिवाय जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावामुळे जगभरातील बाजाराचा मूडही बिघडला आहे. या सगळ्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 22 February 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x