16 May 2024 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार? Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण? IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

नवरदेवाचं लग्नाच्या पत्रिकेतून मोदींना मतं देण्याचं आवाहन; निवडणूक आयोगाची कारवाई

BJP, Narendra Modi

नवी दिल्ली : सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना भाजप आणि मोदी सार्थक देखील निरनिराळे फंडे अंमलात आणत आहे. त्याचाच भाग म्हणजे एका मोदी समर्थकाने स्वतःच्या लग्न पत्रिकेवर नरेंद्र मोदी म्हणजे भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलं आणि लग्न गडबडीतच निवडणूक आयोगाच्या कचाट्यात सापडला आहे. सदर इसम हा नगरचा असून फिरोज शेख असं त्याच नाव आहे. सुजय विखेंना मतदान करण्याचं त्याने लग्न पत्रिकेद्वारे आवाहन केलं होतं.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी स्वतःच्या लग्न पत्रिकेचा वापर करणं मोदी समर्थकाला महागात पडलं आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्याला नोटीस देखील बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे असे फंडे याआधी देखील अनेकांनी केले असून, त्याला समाज माध्यमांवर प्रसिद्धी मिळाल्याने अनेकांनी तोच कित्ता गिरवल्याचे पाहायला मिळाले.

त्यामुळे भर लगीन सराईच्या धामधुमीत नवरदेव कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. लग्न ठरलं आणि प्रसिद्धीसाठी नकोतो स्टंट केला खरा, पण स्वतःसोबत कुटुंबाची देखील डोकेदुखी वाढवली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x