19 May 2024 5:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

JSW Steel Share Price | या शेअरने 50 हजार रुपयांवर दिला 16 लाख रुपये परतावा, स्टॉक आणखी वेगाने वाढणार?

JSW Steel Share Price

JSW Steel Share Price | मागील काही महिन्यांपासून शेअर बाजार खूपच अस्थिर झाला आहे. या काळात शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. अनेक गुंतवणूकदारांना मोठे नुकसान देखील सहन करावे लागले आहेत. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या उलाढालीचा जास्त फटका बसला नाही. दीर्घकालीन गुंतवणूकदार अजूनही नफ्यात आहेत, कारण गुंतवणूकदारांचे होणारे नुकसान दीर्घकाळात कव्हर होऊन जाते. किंवा ते आधीच इतके फायदेशीर असतात की अल्पकालीन तोट्याचा त्यांच्या गुंतवणुकीवर परिणाम होत नाही. जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या स्टॉकने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. हा शेअर भविष्यातही चांगला परतावा देईल असे मात्र तज्ञांनी व्यक्त केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, JSW Steel Share Price | JSW Steel Stock Price | BSE 500228 | NSE JSWSTEEL)

गुंतवणुकीवर परतावा :
‘जेएसडब्ल्यू स्टील’ कंपनीच्या शेअरने दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. एप्रिल 1996 पासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने लोकांना 3276 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1996 मध्ये या कंपनीचे शेअर्स 20.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सोमवार दिनाक 6 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के घसरणीसह 675.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 3,275.93 टक्के परतावा मिळवून दिला आहे. एवढ्या परताव्यासह, गुंतवणूकदारांचे 50 हजार रुपये वाढून 16 लाखांपेक्षा जास्त झाले आहे.

5 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट :
‘जेएसडब्ल्यू स्टील’ कंपनीच्या शेअर्सने मागील 5 वर्षांत लोकांना खूप चांगला परतावा मिळवून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 291.20 रुपयांवरून वाढून 683 रुपयांवर पोहचले आहेत. यातून गुंतवणूकदारांनी 134.5 टक्के परतावा कमावला आहे. या परताव्यासह, गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. जेएसडब्ल्यू स्टील ही एक लार्ज कॅप कंपनी आहे.

कंपनीचे बाजार भांडवल :
‘जेएसडब्ल्यू स्टील’ कंपनीचे बाजार भांडवल 1,65,084.07 कोटी आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 789.95 रुपये होती. तर शेअरची नीचांक पातळी किंमत 520.10 रुपये होती. ‘जेएसडब्ल्यू स्टील’ ही कंपनी 1982 मध्ये सुरू आली होती.

तज्ञांचा अंदाज :
‘जेएसडब्ल्यू स्टील’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 755 रुपयांपर्यंत वाढू शकतात. सध्या हा स्टॉक 675.20 रुपये किमतीवर आला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना अल्पावधीत 10-11 टक्के परतावा सहज मिळू शकतो. लार्ज कॅप कंपन्यांमध्‍ये गुंतवणूक करण्यात जोखीम नसते. आणि या स्टॉकमधून परतावा मिळण्‍याची शक्यता खूप जास्त असते. यामुळे या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणे खूप फायदेशीर ठरू शकते.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड’ कंपनी ही मुंबई स्थित एक भारतीय बहुराष्ट्रीय पोलाद उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी जेएसडब्ल्यू उद्योग समूहाचा भाग आहे. इस्पात स्टील आणि जिंदाल विजयनगर स्टील लिमिटेड कंपनीचे विलीनीकरण झाले, आणि जेएसडब्ल्यू स्टील ही भारतातील खाजगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी स्टील कंपनी बनली. जेएसडब्ल्यू स्टील कंपनीची सुरुवात 1982 मध्ये झाली होती, तेव्हा जिंदाल समूहाने ‘पिरामल स्टील लिमिटेड’ कंपनी खरेदी केली होती. ‘पिरामल स्टील लिमिटेड’ कंपनी महाराष्ट्रातील तारापूर येथे एक मिनी स्टील मिल कंपनी चालवत होती, तिचे नामकरण ‘जिंदाल आयर्न अँड स्टील कंपनी’ असे करण्यात आले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JSW Steel Share Price 500228 JSWSTEEL stock market live on 06 March 2023.

हॅशटॅग्स

JSW Steel Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x