17 May 2024 9:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Tata Technologies IPO | तयारी करा! टाटा ग्रुपच्या कंपनीचा IPO लाँच होतोय, खरेदीपूर्वी हा तपशील मदत करेल

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | काही आठवड्यांपूर्वी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO बद्दल बऱ्याच चर्चा होत होत्या. आता त्यावर एक नवीन अपडेट आली आहे. B & K सिक्युरिटर्टीज फर्मने ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO बाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालमध्ये ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीची तुलना तिच्या स्पर्धक KPIT Technologies, Tata Elxsi, L & T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, यांच्याशी करण्यात आली आहे. B & K सिक्युरिटीज फर्मने ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीची तुलना स्पर्धक कंपनीसोबत महसूल वाढ, अनुलंब एक्सपोजर, प्रादेशिक एक्सपोजर, हेडकाउंट वाढ, यांसारख्या पॅरामीटर्सवर केली आहे. (Tata Technologies Limited)

B&K सिक्युरिटीज फर्मच्या अहवालानुसार मागील तीन वर्षांत ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या महसुलात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ आर्थिक वर्ष 20-22 मध्ये 8.6 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दराने वाढ नोंदवली आहे. KPIT Tech, LTTS आणि Tata Elxsi या दिग्गज कंपन्यांनी अनुक्रमे 4 टक्के, 5.8 टक्के, आणि 21.2 टक्के CAGR वाढ नोंदवली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा EBITDA मार्जिन 15.9 टक्के नोंदवला गेला आहे.

KPIT Tech कंपनी प्रमाणे ‘टाटा टेक्नॉलॉजी’ देखील ऑटोमोटिव्ह वर्टिकलवर लक्ष केंद्रित करते. कंपनीच्या एकूण महसुलात याचा वाटा 75 टक्के पेक्षा अधिक आहे. केपीआयटी, टाटा एल्क्सी, LTTS अनुक्रमे 31.4 / 35.1 / 34.9 टक्क्यांच्या तुलनेत ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने ऑटोमोटिव्ह वर्टिकलमध्ये सर्वाधिक म्हणजेच 35.6 टक्के महसूल वाढ प्राप्त केली आहे. B&K फर्मने सांगितले की, ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले असून नवीन प्रतिभा आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन उपक्रम देखील सुरू केले आहेत. दरम्यान मागणीत वाढ आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊनही टाटा टेक्नॉलॉजी कंपनीची हेडकाउंट वाढ या क्षेत्रात सर्वात कमी आहे.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने नुकताच सेबीकडे IPO साठी कागदपत्र दाखल केले आहेत. IPO मसुद्यानुसार, टाटा मोटर्स कंपनीने 8,11,33,706 इक्विटी शेअर्स म्हणजेच आपल्या एकूण भांडवलाच्या 20 टक्के शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकण्याचा प्रस्ताव दिला आहे. अल्फा टीसी होल्डिंग्ज आपले 97,16,853 इक्विटी शेअर्स म्हणजेच 2.40 टक्के वाटा विकणार असून, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड देखील 1.20 टक्के म्हणजेच 48,58,425 इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO check details on 27 March 2023.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x