2 May 2024 1:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Shivalik Bimetal Controls Share Price | 3 वर्षात 1 लाखावर 38 लाख परतावा देणारा शेअर लक्षात ठेवा, गुंतवणुकदार झाले मालामाल

Shivalik Bimetal Controls Share Price

Shivalik Bimetal Controls Share Price | ‘शिवालिक बिमेटल कंट्रोल्स लिमिटेड’ या धातू उद्योगात गुंतलेल्या स्मॉल कॅप कंपनीने मागील 3 वर्षांत आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.23 टक्के घसरणीसह 525.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग झाली आहे. मात्र दीर्घ काळात या कंपनीच्या शेअर ने आपल्या मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 14.47 रुपयांवरून वाढून 525 रुपयेवर आले आहे. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Shivalik Bimetal Controls Limited)

1 लाखावर 38 लाख परतावा :
‘शिवालिक बिमेटल’ कंपनीचा स्टॉक मागील एका वर्षभरात 53.36 टक्के वाढला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून हा स्टॉक 32.87 टक्के आणि मागील 1 महिन्यात हा स्टॉक 26.13 टक्के वाढला आहे. मागील 3 वर्षांत ‘शिवालिक बिमेटल’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3,662 टक्के परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच के तुम्ही 3 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 37.62 लाख रुपये झाले असते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,057 कोटी रुपये आहे.

कंपनीची कामगिरी :
डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘शिवालिक बिमेटल कंट्रोल्स लिमिटेड’ कंपनीने 16.66 कोटी रुपये निव्वळ नफा कामवला होता, जो मागील वर्षीच्या तुलनेत 7.48 टक्के जास्त होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 15.50 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने 118.39 कोटी रुपये सेल्स नोंदवला होता. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीतील कंपनीचा सेल्स 88.13 कोटी रुपये होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परकी किंमत 544.95 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 219.81 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shivalik Bimetal Controls Share Price on 30 March 2023.

हॅशटॅग्स

Shivalik Bimetal Controls Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x