12 May 2024 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम, सोनं स्वस्त झालं, पटापट आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून अस्थिरता आहे. पूर्वी ६० हजाररुपयांचा विक्रम करणारे सोने आता घसरले आहे. त्याचप्रमाणे चांदीनेही फेब्रुवारीमध्ये ७१ हजार रुपयांचा विक्रम केला होता. यंदा दिवाळीत दोन्ही मौल्यवान धातू तेजीचा नवा विक्रम करतील, असा तज्ज्ञांचा दावा आहे. तज्ज्ञांचा असा दावा आहे की सोने 65,000 रुपयांपर्यंत आणि चांदी 80,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

सोन्या-चांदीच्या दरात घसरण
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी शुक्रवारी सराफा बाजारात तेजी दिसून आली होती. एमसीएक्सवर सोमवारी सकाळी सोने 635 रुपये प्रति 10 ग्रॅम वर स्वस्त होऊन ट्रेड करत आहे. याआधी शुक्रवारी चांदी 72218 रुपये आणि सोनं 59612 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झालं होतं.

सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 59251 रुपयांवर खुला झाला आहे. मागच्या वेळी हाच दर 59751 रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाला होता. त्यामुळे सराफा बाजारात आज सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम ५०० रुपयांच्या घसरणीसह उघडले आहेत. सोन्याने 20 मार्च 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ५९४७९ रुपयांवर गेले होते.

तुमच्या शहरातील आजचे नवे दर
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 54730 रुपये, 24 कॅरेट सोने : 59700 रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये
* लातूर – २२ कॅरेट सोने : ५४७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७०० रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 54700 रुपये, 24 कॅरेट सोने : 59670 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५४७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७०० रुपये
* पुणे – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 03 April 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x