16 May 2024 2:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Indian Bank Share Price | या बँकेच्या वार्षिक FD परताव्या पेक्षा या शेअरवर 10 पटीने वार्षिक परतावा मिळतोय, मजबूत कमाई करू शकता

Indian Bank Share Price

Indian Bank Share Price | आज पासून नवीन आर्थिक वर्ष 2023-24 ची सुरुवात झाली आहे. शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक PSU बँकांचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. काही शेअरची कामगिरी आणि वाढीची क्षमता पाहून ब्रोकरेज फर्म ICICI Direct ने ‘इंडियन बँक’ या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शेअर मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील 1-2 आठवड्यांत ‘इंडियन बँक’ चे शेअर्स मजबूत वाढतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Indian Bank Limited)

‘इंडियन बँक’ शेअरची लक्ष्य किंमत :
आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी ‘इंडियन बँक’ चे शेअर्स 0.66 टक्के वाढीसह 290.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘इंडियन बँक’ शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 310 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 137 रुपये होती. इंडियन बँकेचे एकूण बाजार भांडवल 36,200 कोटी रुपये आहे. ब्रोकरेज फर्मने हा स्टॉक 283-288 रुपये किमतीवर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तेजीच्या स्थितीत हा स्टॉक 309 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असे तज्ञ म्हणतात. घसरणीच्या काळात जास्त नुकसान होऊ नये म्हणून तज्ञांनी 267 रुपयेचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक 309 रुपये लक्ष किंमत पुढील 14 दिवसांमध्ये स्पर्श करेल असे तज्ञांना वाटते.

मागील तीन महिन्यांत इंडियन बँकेचे शेअर्स फक्त 1.63 टक्के वाढले आहेत. मागील मागील पाच दिवसात बँकिंग स्टॉकने लोकांना 8.84 टक्के इतका परतावा दिला आहे, जो एफडी सारख्या गुंतवणूक पर्यायपेक्षा खूप चांगला आहे. सपोर्ट लेव्हलवर स्टॉकमध्ये खरेदीदारांची एंट्री होत आहे. इंडियन बँक या सरकारी बँलेचे शेअर्स मागील एका महिन्यात काही खास कामगिरी करु शकले नाही. मात्र पुढील काळात हा स्टॉक काही वाढू शकतो. अपट्रेंडमध्ये शेअरची किंमत 310 पातळीपर्यंत जाऊ शकते, म्हणून जर तुम्हाला पैसे वाढवायचे असतील तर तुम्ही हा स्टॉक खरेदी करू शकता.

गुंतवणुकीवर परतावा :
‘इंडियन बँक’ या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. जेवढा परतावा तुम्हाला एफडीमध्ये एका वर्षात मिळतो, त्यापेक्षा जास्त म्हणजेच 8 टक्के परतावा या बँकेच्या शेअरने एका आठवड्यात दिला आहे. मागील एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 79.81 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 53.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या बँकिंग स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 6.75 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indian Bank Share Price on 03 April 2023.

हॅशटॅग्स

#Indian Bank Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x