18 May 2024 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

Hindware Home Innovation Share Price | गुंतवणूकीची संधी! 425% परतावा देणारा शेअर खरेदी करा, स्टॉक डिटेल्स पहा

Hindware Home Innovation Share Price

Hindware Home Innovation Share Price | मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 425 टक्के परतावा दिल्यानंतर ब्रोकरेज फर्म नुवामाने ‘हिंडवेअर होम इनोव्हेशन’ कंपनीच्या शेअरमध्ये आणखी वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. 2015 ते 2018 पर्यंत ‘हिंडवेअर होम इनोव्हेशन’ कंपनीने सॅनिटरीवेअर उत्पादन, ग्राहक उपकरणे, प्लास्टिक पाईप्स आणि फिटिंगसारख्या व्यवसायात विस्तार केला आहे. मार्च 2020 मध्ये ‘हिंडवेअर होम इनोव्हेशन’ कंपनीचे शेअर्स 67.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.24 टक्के वाढीसह 352.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Hindware Home Innovation Limited)

शेअरवर ‘बाय’ रेटिंग
नुवामा फर्मने ‘हिंडवेअर होम इनोव्हेशन’ कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 546 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर आपल्या गुंतवणूकदारांना 36 टक्के नफा मिळवून देऊ शकतात. नुवामा फर्मचे तज्ञ म्हणाले, “बाथवेअरमधील मजबूत स्थिती, पाईप्स अँड फिटिंग्ज आणि ग्राहक उपकरणांमध्ये वाढती मागणी, तसेच मोठा उत्पादन पोर्टफोलिओ, मजबूत ब्रँड रिकॉल आणि वितरकांची विस्तृत साखळी, हे सर्व विचारात घेता, आम्ही मध्य ते दीर्घ कालावधीसाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहोत”.

दिग्गज गुंतवणूकदार ‘सुनील सिंघानिया’ यांच्या मालकीच्या अबॅकस ग्रोथ फंड 1 आणि अबॅकस ग्रोथ फंड 2 यांनी मिळून ‘हिंडवेअर होम इनोव्हेशन’ कंपनीचे 4.88 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आशिष कचोलिया, मुकुल महावीर अग्रवाल, आणि पोरिंजू वेलियाथसह इक्विटी इंटेलिजन्स इंडियासह इतर इक्विटी गुंतवणूकदारांनाही मागील वर्षी 31 डिसेंबर 2022 पर्यंत ‘हिंडवेअर होम इनोव्हेशन’ कंपनीमध्ये अनुक्रमे 1.33 टक्के, 1.38 टक्के आणि 1.05 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. मार्च 2023 तिमाहीचा शेअरहोल्डिंग डेटा अद्याप जाहीर झाला नाही.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या नऊ महिन्यात म्हणजेच 31 डिसेंबर 2022 पर्यंत, ‘हिंडवेअर होम इनोव्हेशन’ कंपनीची निव्वळ विक्री 30.93 टक्के वाढीसह 2,105.42 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 79 टक्क्यांच्या घसरणीसह 34.81 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मार्च 2022 रोजी संपलेल्या वर्षासाठी ‘हिंडवेअर होम इनोव्हेशन’ कंपनीने 2293.63 कोटी रुपयांच्या एकत्रित निव्वळ विक्रीवर 201.68 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2019 मध्ये 1670.88 कोटी रुपये निव्वळ विक्रीवर कंपनीने 54.70 कोटी नफा कमावला होता.

ब्रोकरेज फर्मचा अंदाज :
नुवामा फर्मला अपेक्षा आहे की, पुढील काळात ‘हिंडवेअर होम इनोव्हेशन’ कंपनीचा EBITDA मार्जिन आर्थिक वर्ष 2022-25 मध्ये 391 बेसिस पॉइंट्सने वाढू शकतो. सर्व विभागांमध्ये होणारे फायदे, बिल्डिंग उत्पादनांमध्ये उत्पादन युनिट्सचे एकत्रीकरण, ऑपरेशनल कार्यक्षमता, कमोडिटी प्रेशर कमी करण्यामुळे EBITDA मार्जिन मध्ये वाढ अपेक्षित आहे. ब्रोकरेज फर्मच्या अंदाजानुसार मजबूत महसूल वाढ आणि मार्जिन सुधारणेमुळे कंपनीचा परिपूर्ण EBITDA आर्थिक वर्ष 2022+25 मध्ये 36 टक्के CAGR पर्यंत वाढू शकतो. तसेच कंपनी आर्थिक वर्ष 2022-25 दरम्यान कंपनीच्या सेल्समध्ये 18 टक्के वाढ अपेक्षित आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hindware Home Innovation Share Price on 05 April 2023.

हॅशटॅग्स

Hindware Home Innovation Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x