14 May 2024 8:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Yes Bank Share Price | येस बँकेचा विक्रम, ही कामगिरी करणारी भारतातील पहिलीच कंपनी, रिलायन्स टाकले मागे, शेअर तेजीत येणार?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | ‘येस बँक’ च्या नावावर नुकताच एक विक्रम नोंदवला गेला आहे. मार्च 2023 पर्यंतच्या भाग भांडवल आकडेवारीनुसार ‘येस बँक’ च्या एकूण शेअर धारकांची संख्या 50 लाखांच्या पार गेली आहे. हा भीम पराक्रम करणारी येस बँक ही भारतातील पहिलीच कंपनी ठरली आहे. सर्वात जास्त शेअर धारकांच्या बाबतीत ‘टाटा पॉवर’ कंपनी भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. टाटा पॉवर कंपनीमध्ये 38.5 लाख शेअर धारकांनी गुंतवणूक केली आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमध्ये एकूण 33.6 लाख शेअर धारक आहेत. (Yes Bank Limited)

मीडिया रिपोर्टनुसार डिसेंबर 2022 तिमाहीच्या शेवटी ‘येस बँक’ च्या एकूण शेअर धारकांची संख्या 48.1 लाख नोंदवली गेली होती, जी मार्च 2023 पर्यंत वाढून 50.6 लाखावर गेली आहे. विशेष म्हणजे येस बँकेमध्ये सर्व शेअर्स सार्वजनिक गुंतवणुकदार धारण करत आहेत. दरम्यान येस बँकेचे शेअर्स 13 एप्रिल 2023 रोजी 0.97 टक्के घसरणीवरसह 15.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात येस बँकच्या शेअर्समध्ये 1.93 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात येस बँक स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 8.16 टक्के परतावा कमावून दिला आहे.

येस बँकेच्या शेअर्सची कामगिरी :
मागील एका वर्षात येस बँक स्टॉकने 24.8 रुपये ही सर्वोच्च किंमत स्पर्श केली होती. सध्या येस बँकेचे शेअर्स आपल्या सार्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 38 टक्के खाली ट्रेड करत आहेत. येस बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 12.20 रुपये होती. मागील काही काळापासून येस बँक शेअर्समध्ये तीन वर्षाचा लॉक इन कालावधी संपल्यामुळे घसरण होत होती.

2020 मध्ये RBI ने येस बँकेला वाचवण्यासाठी पुनर्रचना योजना बनवली होती. ज्या अंतर्गत येस बँकेच्या सर्व गुंतवणूकदारांना मार्च 2023 पर्यंत त्यांचे शेअर विकण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र आता हा लॉक इन कालावधी पूर्ण झाल्यामुळे येस बँकेचे शेअर्स धारक स्टॉक विकत आहेत. त्यामुळे शेअर्समध्ये घसरण पहायला मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price on 15 April 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x